AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या व्यक्तीला उमेदवारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Sharad Pawar NCP: रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे चित्र आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या व्यक्तीला उमेदवारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
sharad pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 13, 2024 | 2:06 PM
Share

दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले. एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिला अन् अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.

राष्ट्रवादी पक्षात नाराजी

रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम पाटील यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिला. महायुतीच्या रक्षा खडसे उमेदवार आहेत. यामुळे रावेरमध्ये दोघांमध्ये ही सरळ लढत होणार आहे. परंतु आता भुसावळचे माजी आमदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष चौधरी यांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षात नाराजी वाढल्याचे चित्र आहे.

दोन महिन्यात पक्षात बदल

रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी दोन महिन्यांत हातातील कमळ सोडले आणि तुतारी वाजवली. भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेल्या श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर भुसावळ, रावेर, वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

संतोष चौधरी बंड करणार?

रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे चित्र आहे. दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?