Bhavesh Kavre : मनसेने कोंबडीच्या पायाचा हार घातला अन् भावेश कावरे नरमला, फ्लॅट विक्री प्रकरणात थेट माफी!

रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे कधीकाळी सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला होता. पण आता हाच भावेश कावरे एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Bhavesh Kavre : मनसेने कोंबडीच्या पायाचा हार घातला अन् भावेश कावरे नरमला, फ्लॅट विक्री प्रकरणात थेट माफी!
bhavesh kavre apology
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 3:58 PM

Bhavesh Kavre : रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे कधीकाळी सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला होता. पण आता हाच भावेश कावरे एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्हाला ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, असं कावरे आपल्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय. मनसे, ठाकरे गटाने या व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर आता भावेश कावरेने माफी मागितली आहे.

मनेसेने नेमकं काय केलं?

मिळालेल्या माहितीनुसार भावेश कावरे हा ताडदेवमध्ये एका फ्लॅट विक्रीसाठी व्हिडीओच्या माध्यमातून जाहिरात केली होती. या जाहिरातीत तो मटण- मच्छी खाणाऱ्यांना फ्लॅटची विक्री केली जाणार नाही, असं बोलला होता. त्याच्या याच विधानाला विरोध केला जातोय. मनसे आणि ठाकरे गटाने तर  कावरेने माफी मागावी, अशी मागणी केली होती. मनसेने थेट खळखट्याकचा इशारा दिला होता. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट कावरेच्या घरी जाऊन त्याच्या घरापुढच्या नेम प्लेटला कोंबडीच्या पायांचा हार घातला. या सर्व घडामोडी घडत असताना कावरेने या प्रकरणी माफी माफी मागितली आहे.

मनसे, ठाकरे गटाने काय आक्षेप घेतला?

भावेशचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. मुंबई ही मेट्रोपॉलिटन शहर आहे. या शहरात अनेक धर्माचे, जातीचे लोक राहतात. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला फ्लॅट नाकारणे चुकीचे आहे, अशी भूमिका मनसे, ठाकरे गटाने घेतली होती. मनसेचे दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी भावेशविरोधात तक्रारही दाखल केली होती. अगोदर भावेशने आपल्या व्हिडीओचे समर्थन केले होते. ची त्यांची श्रद्धा आहे, त्यांना मी दुखावणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाकाहारी आणि मासांहारी देखील होते. तेव्हा शाकाहारी लोकांना त्रास देत नव्हते. शाकाहारी लोकांना मासांहारी करण्यास बळजबरी करत नव्हते. त्या काळात पकडून ठोकण्याची भाषा केली जात नव्हती, असे भावेश म्हणाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us