AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! निकाल लागताच घरात ठिणगी; काका पुतण्याचं बिनसलं, पुण्यात नेमकं काय घडतंय?

महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं असून, विरोधकांना मोठा धक्का बसला आहे, दरम्यान या निकालानंतर आता पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! निकाल लागताच घरात ठिणगी; काका पुतण्याचं बिनसलं, पुण्यात नेमकं काय घडतंय?
Tanaji SawantImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 17, 2026 | 6:26 PM
Share

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आमदार सावंत आणि धनंजय सावंत यांच्यामध्ये बिनसल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांनी स्वतंत्र बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीसाठी वापरण्यात आलेल्या बॅनरवर कुठेही आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे सावंत कुटुंबातील हा वाद स्वतंत्र दिशेने जात असल्याचे संकेत मिळत असून, धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. एकीकडे आमदार तानाजी सावंत हे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे धनंजय सावंत हे भाजपच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्नही  राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. धनंजय सावंत नेमके कोणत्या पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी त्यांच्या हालचालींमुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे. सावंत कुटुंबातील हा राजकीय पेच जिल्हा परिषद निवडणुकीत काय वळण घेणार, आणि धनंजय सावंत हे कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, एकीकडे पुणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे आता पुतण्याच नाही तर भावाने देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत आणि दुसरा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांनी देखील तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा ठरलेला भाजप प्रवेश अनेक दिवसापासून रखडला आहे. दरम्यान प्रवेश रखडण्यामागचं खरं कारण शिवाजीराव सावंतानी थेट मेळाव्यातुन जाहीरपणे बोलून दाखवलं आहे.  माझा भाऊ तानाजी सावंतानी मुख्यमंत्र्याना घेऊ नका असं सांगून माझा पक्ष प्रवेश थांबवला. कुटूंबातील दुसरा कोणी राजकारणात पुढे येऊ नये असा डाव आणी तशी मानसिक स्थिती त्यांची झाली असून, भावाला कुणाची तरी नजर लागली आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे, त्यामुळे आता सावंत कुटुंबात आता काका विरुद्ध पुतण्यात -भाऊ असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...