बाळा बोठेला आता ‘टायमिंग’चाही धक्का ? रेखा जरे हत्या प्रकरणाला आणखी एक वळण

बाळ बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाळ बोठेची धाकधूक आणखी वाढली आहे.

बाळा बोठेला आता 'टायमिंग'चाही धक्का ? रेखा जरे हत्या प्रकरणाला आणखी एक वळण
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 10:51 PM

अहमदनगर : अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी जेष्ठ पत्रकार बाळ बोठेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बाळ बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाळ बोठेची धाकधूक आणखी वाढली आहे. अधिक माहितीनुसार, अटकपूर्व जामिनावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. (rekha jare murder accused bal bothes hearing on bail application extended till monday)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळा बोठे हा अद्याप फरार आहे. पण त्याने वकिलाच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आता आज सुनावणी होणार होती. पण जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलली आहे. पोलिसांचं म्हणणं आलं नसल्याने सुनावणी पुढे ढकलल्याची माहिती न्यायालयाकडून देण्यात आली आहे. पण पोलिसांनी या प्रकरणात अद्याप आपलं म्हणणं का मांडलं नाही? यावर अजून काही तपास सुरू आहे का? अशा प्रश्नांमुळे आता रेखा जरे हत्या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. तर एकीकडे बाळा बोठेच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

खरंतर, राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मारेकऱ्यांना पकडले होते. मारेकऱ्यांची चौकशी केली असता पत्रकार बाळासाहेब बोठे यानेच 6 लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. अशात पोलिसांकडून बोठे यांच्या घरावर धाडही टाकण्यात आली होती.

कोण आहे बाळासाहेब बोठे?

बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.

पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला आहे. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी देखील बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. त्याच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचाही एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (rekha jare murder accused bal bothes hearing on bail application extended till monday)

इतर बातम्या –

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाचा ‘धडा’!

(rekha jare murder accused bal bothes hearing on bail application extended till monday)

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.