रोहिणी खडसे यांनी हातात पकडला जिवंत साप, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

Rohini Khadse Snake Video : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहिणी खडसे यांनी एक साप आपल्या हातात पकडला आहे.

रोहिणी खडसे यांनी हातात पकडला जिवंत साप, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल
Rohini Khadase Snake Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 12, 2026 | 9:48 PM

साप हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. कारण जगात दरवर्षी साप चावल्याने हजारो लोकांचा मृत्यू होतो. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहिणी खडसे यांनी एक साप आपल्या हातात पकडला आहे. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगरातील स्वतःच्या शेतात धामण साप हातात पकडून त्याचे पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

या व्हिडिओमध्ये बोलताना रोहिणी खडसे यांनी सांगितले की, तुमच्या समोर हा धामण जातीचा साप आहे. हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील ओळखला जातो. आपण पाहतो की सर्पदंशामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. पण हा साप शेतकऱ्यांचा मित्र आहे, हा शेतातील उंदीर असतील, घुस असतील अशे पिकांची नासाडी करणाऱ्या प्राण्यांना खाण्याचे काम हा साप करतो. हा एक बिनविषारी साप आहे.

पुढे बोलताना खडसे यांनी म्हटले की, ‘लोकांच्या मनात असलेले गैरसमज, सापांच्या बाबतीत असलेली भीती यामुळे असे साप मारले जातात. त्यामुळे या प्रजाती बऱ्यापैकी संकटात आलेल्या आहेत. धामण साप ओळखणे सोपं आहे, तोंडाजवळ हा निमुळता आहे आणि याचे शरीर जाड आहे. तसेच शेपटीकडील भाग निमुळता आहे. या सापाच्या पोटाची बाजू पिवळी असते. याची लांबी ही 5-6 फूट ते 10 फूट लांब असतो. हा अतिशय चपळ साप आहे. हा साप दिसला तर मारू नका. याबाबत जनजागृती करण्यासाठी मी याची माहिती शेअर करत आहे.

धामण सापाची माहिती

धामण हा संपूर्ण भारतात आढळणारा बिनविषारी साप आहे. हा साप साधारणपणे 1.5 ते 2.5 मीटरपर्यंत वाढू शकतो आणि हा अतिशय चपळ साप मानला जातो. हा साप शेती, जंगल, गवताळ प्रदेश, गावांच्या आसपास तसेच मानवी वस्तीजवळही आढळतो. हा साप प्रामुख्याने उंदीर, बेडूक, सरडे, पक्षी आणि पक्ष्यांची अंडी खातो. उंदीर मोठ्या प्रमाणात खात असल्यामुळे धामण हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त साप मानला जातो. धामण विषारी नसला तरी त्याला धोका जाणवल्यास तो स्वतःच्या बचावासाठी चावू शकतो. तसेच याच्या बलाढ्य आकारामुळे अनेकजण याला भितात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us