‘रोहित पवार हा प्रसिद्धीसाठी हपापलेला नेता, एवढं बालिश…,’ काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताला जबाबदार व्यक्तींना वाचवणारा मफलर मॅन दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द देवेंद्र फडणवीसच आहेत असा सनसनाटी आरोप केला आहे.

रोहित पवार हा प्रसिद्धीसाठी हपापलेला नेता, एवढं बालिश..., काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?
Girish mahajan and rohit pawar
| Updated on: Nov 16, 2026 | 9:49 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या यांच्या विमान अपघाती मृत्यूला सुमारे ९ महिने पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपण या अपघातातील जबाबदार व्यक्तींना वाचवणाऱ्या मफलर मॅनचे नाव जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोटो जाहीर करत तेच मफलर मॅन असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रीया दिली असून त्यांनी एवढं बालिश आणि छीचोरे विधान रोहित पवार यांनी करावे याचं आश्चर्य आहे. त्यांना अजितदादांची जागा घेण्याची घाई लागली आहे, मात्र त्यांच्यात ती पात्रता नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की एवढं बालिश आणि छिचोरे विधान रोहित पवारांनी करावं याचा सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे. अजित दादांचा पुण्यातल्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावरून लोकांचं लक्ष विचलित व्हावं यासाठी त्यांनी हे विधान केलेले दिसत आहे. हा माणूस प्रसिद्धीसाठी एवढा हापापलेला आहे, याला काय बोलावं ? कोणाबद्दल बोलावं ? हे देखील कळत नाही. व्हीआरएस कंपनीचे विमानं सर्वच राजकारणी वापरतात, स्वतः रोहित पवार देखील वापरत होते तर मग यामध्ये त्यांचा देखील हात आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी केला आहे.

Loading...

गिरीश महाजन पुढे म्हणाले की त्यांनी तो फोटो दाखवला, तो 2024 चा आहे, आता कोणी कोणाच्या लग्नामध्ये जात नाही का? सुनेत्रा पवार यांनी त्यांना वारंवार अशा पद्धतीची विधाने करू नका असा सल्ला दिला होता तरीही यांची खोड जात नाही असेही ते महाजन म्हणाले.

रोहित पवारांच्या मनात दादांविषयी काहीच प्रेम नाही…

आपण हेडलाईनमध्ये दिसलो पाहिजे, मला टीव्हीवर बघितलं पाहिजे यासाठी अशा पद्धतीचे फालतू स्टेटमेंट ते करत आहेत. रोहित पवारांच्या मनात दादांविषयी काहीच प्रेम नाही, यांना फक्त प्रसिद्धीसाठी आपलं नाव रोज टीव्हीवर आणायचे आहे असाही आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. दादांच्या अपघात प्रकरणात चौकशी सुरू आहे आणि हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारख्या माणसावर एवढा घाणेरडा आरोप करत आहात तुम्हाला हे कळायला पाहिजे. त्यांना अजितदादांची जागा घेण्याची घाई झाली दिसते आहे, मात्र यांची तेवढी पात्रता नाही असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us