AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवार यांचा थेट दावा, म्हणाले, तो…

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक मोठे संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता रोहित पवार यांनी थेट गंभीर आरोप केला. रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्सवर थेट भाष्य केले.

अजित पवार यांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवार यांचा थेट दावा, म्हणाले, तो...
Ajit Pawar plane crash black box
| Updated on: Mar 04, 2026 | 12:02 PM
Share

28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. यावेळी बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती सुरूवातीला होती. मात्र, त्यानंतर अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे स्पष्ट झाले. विमान अपघातादरम्यानचे काही व्हिडीओही पुढे आली. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर तीन ते चार मोठे स्फोट झाले. भीषण आग विमानाला लागली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चार दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यादरम्यान शरद पवार यांनी मोठे भाष्य करत म्हटले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. यादरम्यानच आमदार रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठे संशय व्यक्त करताना दिसत आहेत.

नुकताच रोहित पवार यांनी म्हटले की, रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो यायला हवा होता. पण त्यात त्यांनी दिला नाही. अहमदाबादचा स्फोट मोठा होता. त्यातील ब्लॅक बॉक्स सापडला. त्यातून डेटा निघाला. पण डीजीसीएने तो पूर्णपणे दिला नाही. त्यालाही मोठी कंट्रोवर्सी आहे. तो विषय नंतर घेऊ. यूएसमध्ये लेअरजेट पडलं होतं. त्याचा ब्लॅक बॉक्स सापडला. त्यातील सर्व माहिती रिकव्हरी करण्यात आली.

दुबईत तेजस विमान कोसळलं होतं. आपला पायलट शहीद झाला. पण त्यातील ब्लॅक बॉक्सचा डेटा घेतला आहे. रामचंद्र नावाचे डिरेक्टर आहेत. त्यांनीच अजितदादांच्या ब्लॅक बॉक्सवर सही केली. ब्लॅक बॉक्स ओके आहे म्हणाले. 2023 ला ते असिस्टंट डायरेक्टर होते. आता त्यांची पदोन्नती झाली.

ब्लॅक बॉक्सवर फक्त राख बसली आहे. ते डॅमेज झालं नाही. राख बसली म्हणून ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला असे म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे. या ब्लॅक बॉक्सच्या आत एक चीप असते. हा फोटो रिपोर्टमध्ये यायला हवा होता. पण दुर्देवाने आला नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी मोठा दावा करत म्हटले की, ब्लॅक बॉक्स डॅमेज झालेला नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...