Rohit Pawar : तुम्ही, तुमचे नेते येऊन गेले, पण… सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर रोहित पवारांचं जोरदार उत्तर
पुण्यातील MPSC आंदोलनाच्या स्थगितीनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विद्यार्थ्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांना रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील विद्यार्थ्यांचं एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर युद्धात जिंकलो आणि तहात हरलो अस वाटतेय, प्रमुख मागणी अध्यक्ष राजीनामा हवा होता. अनेक परीक्षाच्या तारखाचा घोळ आयोगाला कळत नाही, प्री आणि मेन्स एकाच दिवशी येतात. भीमनवार यांना रजेवर पाठवले असते तर मुख्यमंत्री यांनी ट्विट केले असते मात्र त्यांनी स्वतः ट्विट केलेय त्यातून ते सांगत आहे… मला कोणी काढू शकत नाही मी स्वतः रजेवर जात आहे. विद्यार्थ्यांच्या हातात काहीच पडलेले नाहीये. जर गुन्हे मागे घेणार असतील, तर विश्रामबाग पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागायला हवी, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
मागण्या कुठल्याच मान्य झाल्या नाहीत
विक्रम पाचपुतेने अर्बन नक्षली म्हणले ते साधे शब्द देखील मागे घेतले गेले नाही, मग कस आंदोलन यशस्वी झाले? आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सरकार पूर्वग्रहदोष होणार नाही? पदवीधरच्या निवडणूकीला फटका बसू नये म्हणून तात्पुरती नाराजी दूर केली गेलीय. सरकारने विद्यार्थ्यांची चेष्टा केलीय. रोहीत पवारांनी वेळ दिला, योगदान दिलं, मात्र हातात काहीही पडलेलं नाही. विद्यार्थ्यांच्या पदरात काही पडलेले नाही, मराठा आंदोलनात जस झाले तसच पुन्हा झालं, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
रोहित पवारांचं अंधारेंना जोरदार उत्तर
यानंतर आता सुषमा अंधारे यांना रोहित पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, सुषमा अंधारे आक्रमक बोललात. तिथं तुम्हाला कळवळा होता. पण तुम्ही तिथे रस्त्यावर झोपायला पाहिजे होतं. तुमचे नेते तिथे येवून गेलेलं होते. तुम्ही फक्त बोलून निघून गेलेला आहात. आपल्याला विद्यार्थ्य्याची भूमिका मांडणं महत्वाचं आहे. चर्चेतून मार्ग काढणं महत्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, यावेळी रोहित पवार पुढे म्हणाले की, आमच्या एकूण १५ मागण्या मान्य झाल्या आहेत. काल आम्ही विद्यार्थ्यांना सगळं वाचून दाखवलंच आहे. पदभरती बाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. गेले ११ दिवस राज्यात असणारे भावी अधिकारी आणि सर्व सामान्यांची मूलं ११ दिवस सत्याग्रह करत होते.