Sadabhau khot : सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली-सदाभाऊ खोत

दोन वर्षाच्या काळात एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Sadabhau khot : सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली-सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 4:45 PM

मुंबई : अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आणि सरकारमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असतानाच सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेमध्ये चर्चा होत असताना, दोन वर्षाच्या काळात एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. आता एक नवीन योजना सुरू आहे गावोगावी, मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा, अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला आहे. ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मी मटका, गुटखा या चिठ्या सभागृहात दाखवल्या आहे. सरकारचे यावर लक्ष नाही आणि सरकार म्हणते कुठे गुटखा, मटका नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकार अपयशी ठरलेले आहे

महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे म्हणत मटका आकडेमोड असल्याची चिट्ठी सदाभाऊ खोत यांनी दाखवली आहे. सरकारला यातली वसूली असल्याने सरकार कारवाई करत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. हे सरकार बहिरे आणि लुटमार करणारे सरकार आहे, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सचिन वाझेला अटक झाली आहे तेव्हापासून महाविकास आघाडी वसुली सरकार आहे, अशी सातत्याने टीका भाजपकडून केली जात आहे. तेच याही अधिवेशनात दिसून आले. सदाभाऊ खोत यांनीही याच मुद्यांवरून सरकारला घेरत चौफेर बॅटिंग केली आहे.

Unseason Rain | पुन्हा अवकाळीच्या कळा! नगरमधील शेतकरी गारपिटीनं हवालदिल, द्राक्ष, कांद्याला फटका

Omicron variant: दिलासादायक बातमी! ठाण्यात ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज; उपचारासाठी किती दिवस लागले?

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने एक चूक सुधारली आणि टीम इंडियाचे फलंदाज झाले फेल