खाली डोकं, वर पाय… या तरुणाचं करायचं काय ? 3 तास उलटं लटकूनही ढिम्म ! व्हिडीओ व्हायरल

साक्री तालुक्यातील निजामपूर येथील बसस्थानकाजवळील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुण तब्बल तीन तास बाकावर उलटा लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. नशेमुळे ही अवस्था झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. हा अजब प्रकार पाहून परिसरातील लोक हैराण झाले असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

खाली डोकं, वर पाय... या तरुणाचं करायचं काय ? 3 तास उलटं लटकूनही ढिम्म ! व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Sep 09, 2026 | 5:30 PM

भाग्यश्री कुलकर्णी : सोशल मीडियावर आजकाल बरेच व्हिडीओ येत असतात. काही साधे सोपे, तर काही हसवणारे तर काही व्हिडीओ असे अतरंगी असतात जे पाहून समोरचाही अगदी थक्क होतो. अशा अतरंगी व्हिडीओंची सोशल मीडियावर काही कमी नसते. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला असून त्यातील दृश्य पाहून तुमच्याही कपाळावर आधी आठ्याच पडतील. हा व्हिडीओ आहे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील. भरदिवसाची वेळ, रस्त्यावर गर्दी, वाहनांची येजा सुरू, कित्येक माणसं रस्त्याने आपापल्या कामासाठी येत जात होती. मात्र अचानक काहींची नजर तिथे जवळच असलेल्या बसस्टँडवर गेली आणि तिथलं दृश्य पाहून लोकं हैराणच झाले ना राव !

त्या बसस्टँडजवळ असलेल्या फुटपाथवर एक लोखंडी बाकडवजा बेंच ठेवलेला होता. आणि त्याच बाकड्यावर एक तरूण खाली डोक वर पाय अशा अवस्थेत डोले मिटून पडलेला होता. काळ्या रंगाचा शर्ट, ब्राऊनिश रगाची पँट, एकापायत चप्पल, तर दुसरी तिथेच खाली पडलेली आणि मिटलेले डोळे.. अशा अवस्थेततला तो तरूण बेंचवर पाय आणि जमिनीवर डोकं, असा उलटा लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहून अनेक लोकबकले, काहींना त्याची अवस्था पाहून विचित्र वाटलं, तर काही लोकांनी त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला. पण तो ढिम्म.. तब्बल तीन तास तो तसाच पडलेला होता. हा व्हिडीओ समोर आला असून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

साक्री तालुक्यातील निजामपूर येथे एका तरुणाची विचित्र अवस्थेतील घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बसस्थानकाजवळील बाकड्याला एक तरुण तब्बल तीन तास लटकलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानक परिसरात हा तरुण बराच वेळ एकाच अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आलं. काही नागरिकांनी त्याला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार आवाज देऊनही तरुणाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने उपस्थितांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं.

 

नशेत होता का तो ?

तो तरूण नेमका कोण, कुठला आणि त्याची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, नशेच्या संशयामुळे या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही काळ तो याच अवस्थेत बाकड्याला लटकून राहिल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तरुणाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली? तो नशेत होता की त्यामागे आणखी काही कारण आहे? याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकतं. सध्या सर्वत्र हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us