AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 कोटींच्या प्रकरणाने मोठा भूकंप… श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जरांगेंना…

मनोज जरांगे यांच्या 500 कोटींच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपने श्रीकांत शिंदेंना जरांगे यांना देण्यासाठी 500 कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी मिश्किलपणे 'ते पैसे माझ्यापर्यंत का पोहोचले नाहीत?' असा प्रश्न विचारत दावा फेटाळला आहे.

500 कोटींच्या प्रकरणाने मोठा भूकंप... श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जरांगेंना...
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 1:54 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एक क्लिप व्हायरल केली होती. त्यात मनोज जरांगे यांना देण्यासाठी भाजपने श्रीकांत शिंदेंना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या प्रकरणावर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते 500 कोटी रुपये माझ्यापर्यंत कसे पोहोचले नाही? हा प्रश्न जसा मनोज जरांगे यांना पडलाय, तसा मलाही पडला आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ज्याच्या कुणाकडे 500 कोटी गेले, ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही. जो जरांगे पाटलांना प्रश्न पडलाय, तोच मलाही पडलाय. आता त्या पैसे घेणाऱ्या व्यक्तीला शोधायला मी चाललोय. आम्ही आता तिच चर्चा करत होतो. 500 कोटी एकत्र कसे दिसतील? एवढे पैसे ठेवण्यासाठी किती गाड्या लागतील? अशी आमची चर्चा सुरू होती. मला वाटतं यावर कोण काय बोलतं हे महत्त्वाचं नाही. त्यावर प्रश्न विचारणंही गैर आहे. ज्याने पैसे घेतले त्याची शहानिशा करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मीही त्याला शोधायला निघालोय. तुम्हीही शोधा. तुम्हाला कळलं तर मला सांगा. मला कळलं तर मी सांगतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

मनोज जरांगेंचा दावा

दरम्यान, मनोज जरांगे यांनी एक क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये दोन महिलांचं संभाषण सुरू होतं. या महिलांनी एकनाथ शिंदेंना भाजपने 500 कोटी रुपये दिल्याचं म्हटलंय. मनोज जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी हे पैसे दिल्याचं या महिला म्हणताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी हे पैसे श्रीकांत शिंदेंना दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. ही क्लिप ऐकल्यावर हे खरं आहे की खोटं? याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं. भाजप तुमचा गेम करतंय की माझा गेम करतंय? असा सवालही जरांगे यांनी विचारला होता. या क्लिपमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणाची शिंदे गटाने गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

Follow Us
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....