Manoj Jarange: सरकार शब्दाला जागलं… एक आदेश निघाला… उर्वरीत मागण्यांबाबत सुट्टी नाहीच.. मनोज जरांगेंचा सरकारला तो खणखणीत इशारा

Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate: मराठा आरक्षणातील प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. काल सरकारने एक आदेश काढला. आता जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे.

Manoj Jarange: सरकार शब्दाला जागलं... एक आदेश निघाला... उर्वरीत मागण्यांबाबत सुट्टी नाहीच.. मनोज जरांगेंचा सरकारला तो खणखणीत इशारा
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 02, 2026 | 8:51 AM

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: मराठा आरक्षणासंदर्भातील काही प्रलंबित मागण्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत रणरणत्या उन्हात आमरण उपोषण केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईनंतर आंदोलन मागे घेतले. सरकारने दिलेल्या आश्वासनावर जरांगे यांचं समाधान झाले. सरकारने काल एक आदेशही काढला. तरीही जरांगे पाटील यांनी 58 लाख कुणबी नोंदीविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सरकारला अल्टिमेटमची पुन्हा एकदा आठवण करून दिली.

मयत आंदोलकांच्या कुटुंबियांना MIDC मध्ये नोकरी

मयत आंदोलकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात नोकरी देण्याचा शासनाने निर्णय काढला. त्याचे कौतुक करतो, अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. हे गरजेचं होतं. पण मी यात समाधानी नाही, मराठ्यांना आरक्षण दिलं असतं ते बलिदान गेलं नसतं, त्यांच्या चुकीमुळे हे बलिदान गेले आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

58 लाख नोंदीविषयी सरकारला इशारा

58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्याची सूचना आणि आदेश वरिष्ठ पातळीवर निघणे खूप गरजेचे आहे. त्यांनी आज मंगळवारी काढावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत हे आदेश निघाला पाहिजे की 58 लाख नोंदणी झाल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या, नोंदी सापडून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर तुम्हाला बडतर्फ केलं जाईल, ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडीटी द्या (Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate) ह्या सूचना काढणं खूप गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मंगळवारपर्यंत अल्टिमेट

सरकार दोन-तीन दिवसात करतो म्हटले. उलट त्यांनी एक निर्णय काढला म्हणल्यावर एक दिवस आधी काढलाय, त्यांनी गरीबाची मन जिंकावे असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. हैदराबाद गॅझेट संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश निघणे गरजेचे आहे. सातारा संस्थांचे गॅझेटर, कोल्हापूर, औंध, पुणे बॉम्बे गोरमेंटचे गॅझेटर याचा सुद्धा जीआर काढणे गरजेचे आहे. सूचना काढल्यानंतर आम्ही समाधानी असणार आहोत त्यांनी ते काम तातडीने हाती घ्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

Follow Us