Abdul Sattar: अब्दुल सत्तार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाचा गुलाल उधळणार? मतदानाच्या दिवशीच मोठे भाकीत
Abdul Sattar Big Prediction: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळच्या मतदानाआधारे आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठे भाकीत केले आहे. त्यांच्या या भाकिताने महायुतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Abdul Sattar on Satish Chavan: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. शिंदे सेनेचे शिलेदार आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना असलेला विरोध कायम आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचा हिरारीने प्रचार केला. त्यावरून चर्चा रंगली. पण आज मतदानाच्या दिवशीही चव्हाणांना विरोध करण्याच्या भूमिकेवर सत्तार ठाम आहे. आज मतदानाच्या दिवशी त्यांनी एक मोठे भाकीत केले आहे.
आम्ही गुलाल उधळण्यासाठी जाऊ
सध्याच्या परिस्थितीत सकाळच्या मतदानात तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. मतदान प्रक्रिया पुढे सरकेल, तसे उमेदवारांविषयीचा कल समोर येईल. त्यानंतर अंदाज येईल. महायुतीच्या उमेदवाराविरोधातील माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. आमच्या पालकमंत्री महोदयांनी सुरूवात केली. सतीश चव्हाण यांना आमचा पाठिंबा नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलो. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराची धुरा आम्ही वाहिली. कन्नड, वैजापूर, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर शहरात आम्ही त्यांच्या प्रचारासाठी गेलो. जर आम्ही रोज शब्द बदलला तर मग आमच्या शब्दाला किंमत राहणार नाही. लोक मग आमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही आजही प्रतापसिंह पाटील यांच्यासोबत आहोत. 27 ऑक्टोबर रोजी सुद्धा आम्ही गुलाल उधळण्यासाठी जाऊ, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
एआयच्या माध्यमातून तयार केलेली ऑडिओ क्लिप
मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ बॉम्बवर आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑडिओ क्लिप एआयच्या माध्यमातून तयार केलेली आहे. लवकरच याविषयीची उच्चस्तरीय चौकशी होईल असे ते म्हणाले. चौकशी झाल्यानंतर जरांगे यांना ही क्लिप कोणी दिली. का दिली? त्यांनी ती आताच का समोर आणली, याची सर्व चौकशी होईल. चौकशी झाल्यावर दूध का दूध और पाणी का पाणी होईल. हे बिनबुडाचे आरोप आहे. एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला भविष्यातील मुख्यमंत्री होईल, यामुळे त्यांना गोवण्याचा हा कट असू शकतो असे अब्दुल सत्तार म्हणाले.
सतीश चव्हाण यांना विरोधाच्या भूमिकेवर सत्तार ठाम
अब्दुल सत्तार यांनी सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने मनधरणी करण्यासाठी पारकर पोहचले होते. अब्दुल सत्तार यांची भूमिका प्रचार संपल्यानंतरही कायम आहेत. या भेटीनंतर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. विलास पारकर यांना मी सांगितलं जो पालकमंत्री महोदयांनी सुरुवातीला जो बाईट दिला आमचा पाठिंबा सतीश चव्हाण यांना नाही. त्यानंतर आम्ही कामाला लागलो, आम्ही कामाला लागलो त्यांनी अजून प्रेस घेतली त्यांना कोणाच्या आदेश आहे माहित नाही. पण त्यावेळेस मी पारकर साहेबांना फोन करून विचारलं पालकमंत्री साहेबांनी अस स्टेटमेंट दिल आहे मी काय करू. तेव्हा त्यांनी मला विचारलं आपल्या शिवसेनेच्या हिताचा उमेदवार कोण आहे भविष्यात. मी त्यांना सांगितलं आपले पालकमंत्री महोदय जे बोलले राष्ट्रवादी असेल किंवा सतीश चव्हाण असेल यांच्या बद्दल पुढे काय करायचे ते पालकमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं. त्यानुसार आम्ही कामाला लागलो, आज सुद्धाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पारकर इथे आले आहेत, ते जे बोलले ते मी सगळं ऐकून घेतलं.
सत्तार यांचा रोकडा सवाल
मी पारकरांना विनंती केली जो आपल्या शिवसेना पक्षाला संपवत असेल, त्याच्याबद्दल आम्ही काय करायला पाहिजे. सतीश चव्हाण आमदार असताना आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघात प्रत्येक वेळेस इंटरफेअर करताना मी सतीश चव्हाण यांना पाहिलं, त्यावेळेस ते आम्हाला विरोध करतात आणि नंतर ज्यावेळेस त्यांना मताची गरज पडते तेव्हा ते मनधरणी करतात आणि निवडणुकीचा कार्यकाळ साध्य करून घेतात. परंतु त्यावेळेस सामान्य पदवीधर मतदार नोकरीवर नाही त्याच्याकडे कोणतं उत्पन्नाचे साधन नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुल आहेत. विनायकराव पाटील यांच्या पुतळ्याला कधी सतीश चव्हाण यांनी आहार घातला नाही मात्र प्रतापसिंह पाटील यांनी प्रचाराची सुरुवात त्यांच्या पुतळ्याला हार घालून केली.
ज्या माणसाने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली त्यांची त्याला आठवण नाही. मी गेल्या वेळेस स्वतः त्यांचं काम केलं होतं. कनाथ शिंदे हे आमचे इन्चार्ज पारकर यांना पाठवल आहे त्यांना मी स्पष्ट म्हटलं जो शिवसेनेला विरोध करतो आम्ही त्याला विरोध करणार. जो शिवसेनेचे सत्ता संपुष्टात आणण्यासाठी ज्याचे अनेक पराक्रम आहेत, मी आज बोलणार नाही मात्र वेळ आल्यानंतर बोलेल, मी शिवसैनिकांना विनंती करणार आहे तुम्ही याचा पूर्ण अभ्यास करा अजून एक दिवस बाकी आहे. त्यानंतर मग कुणाला द्यायचं प्रचार कोणाचा करायचा ते डिसाईड करा. पण पक्षाबद्दल मी दुपटी भूमिका वापरली तर माझ्या शब्दाला किंमत राहणार नाही, असे सत्तार म्हणाले.