केंद्रात मोठी उलथापालथ होणार? फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार? मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचा मोठा दावा

केंद्रात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केंद्रात फडणवीसांची वर्णी लागेल. तर भविष्यात मोदींना माघार घ्यावी लागणार, असा दावा राऊतांनी केला आहे.

केंद्रात मोठी उलथापालथ होणार? फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार? मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचा मोठा दावा
| Updated on: Aug 02, 2026 | 11:36 AM

देशात पुढील काही दिवसांत केंद्रात मोठी उलथापालथ होईल, असा दावा केला जात आहे. संजय राऊतांनी केंद्रात देवेंद्र फडवीसांची वर्णी लागणार असल्याचा दावा केला आहे. दिल्ली आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींना भविष्यात माघार घ्यावी लागेल. तर केंद्रात शिक्षणमंत्रिपदी फडणवीसांची वर्णी लागेल, असा दावा देखील राऊतांनी केला आहे. राऊत यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पंतप्रधान मोदींना १२ वर्षांत एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. विद्यार्थी शिक्षणखात्याच्या विरोधात आंदोलन करू लागला. शिक्षण खाते हे तरुणांची पिढी घडवणारं भक्कम खाते असते. कोट्यवधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं. त्याच खात्याला वाळवी लागली. मोदींना माघार घ्यावी लागली. तरुणांनी मोदींचा पराभव केला’.

‘नरेंद्र मोदींच्या यांच्या मनात एक नेता आहे. शिक्षण खात्यावर दूरदृष्टीचा उच्च शिक्षित चांगला प्रशासक नेमावा. आता देशात उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकेल, तर त्यांचं नाव देंवेंद्र फडणवीस आहेत. ते नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. पंतप्रधान मोदींनीही चर्चा केली आहे. आता त्याला मनुष्यबळ विकास खाते म्हणतात. फार मोठं खाते आहे. मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी घ्यावी, अशी सूचना मोदींनी फडणवीसांना दिली आहे, असे राऊतांनी सांगितलं.

‘अशी माहिती माझ्याकडे आहे. कोणी कितीही नकार दिला. तरी ही माझी आहे. मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात गेले, तरी दुसरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण होत नाही. भाजपमध्ये एक परंपरा आहे. दिल्लीतून राज्यात राज्य करायचं. त्यांच्या पक्षाने शेवटच्या बाकावर बसणाऱ्याला मुख्यमंत्री केलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं नाव माहिती आहे का, ते लोक शोधून काढतात. तो कमीत कमी कार्यक्षम, अलोकप्रिय, त्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही. अशा लोकांना भारतीय जनता पक्ष हा पदावर बसवतो. मोदींच्या पंसतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. या देशाला उत्तम शिक्षणमंत्री मिळो, अशी आमची इच्छा आहे, असले त्यांनी पुढे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us