एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे… फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
शिवसेना (उबाठा) गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप पक्षाबाबत धक्कादायक दावा केला आहे. राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील त्यांच्या रोखठोक या अग्रलेखातून खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं नमूद केलं.

सामनातील लेखामध्ये राऊत म्हणाले, दिल्लीत मोदी-शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे, पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीसांना केंद्रात येण्यासाठी सांगितलं किंवा वारंवार सुचवलं असेल, मात्र असं काही झालं नाही. मोदींनी फडणवीसांना सांगितलं की दिल्लीत तुमची गरज आहे वाटल्यास, महाराष्ट्रात पसंतीचा मुख्यमंत्री करून देतील, असाही दावा त्यांनी अग्रलेखातून केला आहे. त्यांच्या लेखाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
याच अग्रलेखात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत राऊत म्हणाले, “एरवी ऊठसुट कोणत्याही विषयांवर बोलणारे आणि गुरगुरणारे गृहमंत्री शहा या प्रकरणात रहस्यमयीरीत्या गप्प राहिले. त्याच्यामागे वेगळंच रहस्य आहे.”
Published on: Aug 02, 2026 10:47 AM
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती