AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला

Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला

| Updated on: Sep 12, 2026 | 1:56 PM
Share

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. माणगावात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपूर्ण महामार्गाच्या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वी कोकणवासीयांना प्रवासात अडथळे येत आहेत.

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणाकडे जाण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण आला आहे. माणगावात वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काहीच तास उरले असताना, कोकणात निघालेल्या कोकणवासीयांची आणि गणेशभक्तांची संख्या प्रचंड वाढलेली दिसत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. महाडच्या दिशेकडे दोन ते तीन लेननी वाहने पुढे सरकत आहेत. माणगाव परिसरातील दृश्यांमध्ये वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे दिसत असून, अक्षरश: वाहने या वाहतूक कोंडीत अडकली आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका कोकणवासीयांना तसेच इतर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना प्रवासात मोठा विलंब सहन करावा लागत आहे.

Published on: Sep 12, 2026 01:56 PM

Follow Us