आता न्याय मिळेल, सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर राऊतांनी व्यक्त केला विश्वास, कोर्टातून बाहेर येताच…

Sanjay Raut : आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं, त्यावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

आता न्याय मिळेल, सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर राऊतांनी व्यक्त केला विश्वास, कोर्टातून बाहेर येताच...
Sanjay Raut on Kapil Sibal
Image Credit source: Google
| Updated on: Aug 11, 2026 | 5:03 PM

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं, त्यावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आजचा युक्तिवाद संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास

निवडणुक आयोगाच्या निर्णयांवर कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला आहे, याबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, हे एक घटनापीठ आहे. या घटनापीठाकडे येणारे खटले हे अनेक कलमांची व्याख्या करणारे असतात. संविधानाच्या एखाद्या कलमाचा भंग झाला असेल आणि त्याच्या विरोधात निर्णय दिला असेल तर त्या संदर्भात सुनावणी होत आहे. शिवसेनेच्या प्रकरणात पावला पावलावर संविधान आणि घटनेचा भंग झाला आहे. त्यामुळे आज कपिल सिब्बल यांनी संविधानाच्या दृष्टीने बाजू मांडली. याद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पिसं काढली. निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली, याचं विवेचन सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे. हे भविष्यातील निकालासाठी माईलस्टोन असेल असा युक्तिवाद सिब्बल यांनी खऱ्या शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने केला. आम्ही सगळे समाधानी आहोत, आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास वाटत आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे.

सिब्बल यांच्या युक्तिवादावर भाष्य

पक्षाची घटना ही असंवैधानिक आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं, यावर तुम्ही कशाच्या आधारे घटना संवैधानिक की असंवैधानिक ठरवणार? हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी म्हटले की, मला असं वाटत नाही. या मुद्द्यावरही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. हा विषय त्यांनी समजावून सांगितलेला आहे. 2018 साली ज्या गाईडलाईन्स निवडणूक आयोगाने दिल्या होत्या, त्याच उल्लंघन आम्ही केलेले नाही. मात्र पक्ष सोडून गेलेल्या लोकांनी त्याच उल्लंघन केलेले आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडलं आहे. आपण एका ऐतिहासिक निर्णयाकडे चाललो आहे. पक्षफुटीसंदर्भात, पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात जी बजबजपुरी या देशात माजलेली आहे, त्या दृष्टीने हे घटनापीठ ऐसिहासिक निर्णय देईल अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसत आहेत.

आम्हाला आशेचा किरण दिसत आहे…

कपिल सिब्बल यांनी पक्षचिन्ह आणि पक्ष दिसऱ्या व्यक्तीला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असाही युक्तिवाद केला. यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही. सिब्बल यांनी सेक्शन 29 मधील मुद्दे न्यायालयासमोर आणले आहेत. देशात झालेली चुकीची पक्षांतरे त्यांनी समोर आणली आहेत. त्यामुळे एक आशेचा किरण आम्हाला दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us