AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...

सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण…

| Updated on: Sep 30, 2026 | 12:50 PM
Share

सचिन वाझेच्या जामीन रद्द करण्याच्या एनआयएच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सत्र न्यायालयाने वाझेला एक लाख रुपयांच्या जामिनावर मुक्त केले होते. त्यामुळे वाझेच्या तुरुंगातून सुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्याला पुणे जिल्ह्यातील बाणेर येथे वास्तव्य करावे लागणार आहे.

सचिन वाझेचा जामीन रद्द करण्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सत्र न्यायालयाने सचिन वाझेला जामीन मंजूर केल्यानंतर एनआयएने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्या. सारंग कोतवाल यांनी यावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर हे प्रकरण न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले.

आज न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठानेही या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार दिल्याने सचिन वाझेच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्र न्यायालयाने वाझेला एक लाख रुपयांच्या श्युरिटीवर जामीन दिला आहे. या जामिनासोबत काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सचिन वाझेने पुणे जिल्ह्यातील बाणेर येथे राहण्याची तयारी दर्शवली आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सचिन वाझेला जामीन मिळाल्यानंतर आता पुढील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

Published on: Sep 30, 2026 12:50 PM

Follow Us