ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ, जितेंद्र नवलानी कौन है, राऊतांनी ईडीच्या वसुली एजंटांची मांडली कुंडली!

| Updated on: Feb 15, 2022 | 5:06 PM

शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, ईडीची हिंमत असेल तर त्यांनी माझ्या घरी यावं. मी नागडा माणूस आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा. आय विल फाईट.

ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ, जितेंद्र नवलानी कौन है, राऊतांनी ईडीच्या वसुली एजंटांची मांडली कुंडली!
संजय राऊत, शिवसेना खासदार.
Follow us on

मुंबईः शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातले भाजप सरकार, ईडी आणि राज्यातले भाजप नेते यांची अक्षरशः पिसे काढली. फायलीमधून एकामागून एक कागद बाहेर काढून त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ. जितेंद्र नवलानी कौन है, असे म्हणत ईडीच्या वसुली एजंटांची कुंडली मांडली. राऊत म्हणाले, मुळात पीएमची घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला जमीन का विकली, असा सवाल करत, हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय. आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

ईडीला काय दिलं आव्हान?

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, दुसरी गंमत तुम्हाला सांगतो. पीएमसची तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो. ईडी भ्रष्ट आहे. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत. हा माझा दावाय. ईडीची हिंमत असेल, तर त्यांनी माझ्या घरी यावं. मी नागडा माणूस आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा. आय विल फाईट, असा इशारा त्यांनी दिला. शिवाय जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे मला ईडीनं सांगावं असं आव्हान दिलं.

ही लोकं नेमकी कोण?

शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, ईडीची हिंमत असेल तर त्यांनी माझ्या घरी यावं. मी नागडा माणूस आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा. आय विल फाईट. जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे ईडीनं मला सांगावं. हे नाव ऐकुण ईडीच्या मुंबई, दिल्ली ऑफिसला घाम फुटलाय. चार महिन्यांपासून मुंबईतल्या बिल्डरांकडून वसुली सुरू आहे. मुंबईतल्या 70 बिल्डरांकडून वसुली केली आहे. हे सारे मी मोदींनी आणि अमित शहांना लिहिणार आहे. या फळीत शमा, रोमी ही लोकं कोण आहेत, असा सवाल ही त्यांनी केला.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!