दादरमधील CJP च्या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, ज्ञानेश कुमार…
दादरच्या CJP च्या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केला.

अभिजीत दिपके यांनी आता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कात आयोजित केलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यानंतरही सीजेपीने आंदोलनाचा नारा दिला आहे. सीजेपीच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. या आंदोलनावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाकडून राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या विरोधात वादळ निर्माण झालं आहे. यावर निश्चितपणे केंद्र सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. परंतु त्याचं राजकारण करता कामा नये. ज्ञानेश कुमारांचं काय करायचं, इथपर्यंत हा विषय ठीक आहे. पण राजकारण करणे, एकमेकांना पाठिंबा देणे आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. त्याला मात्र विरोध राहील’.
राज्यातील दुष्काळावर मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, दुष्काळ पडतो, त्यावेळी पंचनामा करण्याची एक ठराविक पद्धत आहे. केंद्र शासनाचा नियम पाहिला, तर ड्रोनद्वारे मॅपिंक केलं जातं. आता जरी काही भागात बघितलं तर वरून हिरवेपण दिसेल. पीक उभे असल्याचे दिसेल. उदाहरण सांगायचं झालं, तर मका. तुम्हाला वरून मका हिरवागार दिसेल. परंतु त्याला मक्याला प्रत्यक्षात पिके नसतात. कापूस, सोयाबीनची देखील तीच अवस्था आहे. घटनास्थळी पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. शेतकऱ्यांमध्ये गोंधळ होऊ नये. शेतकरी कोणत्याही भागातील असला तरी दुष्काळाच्या झळानंतर मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही. काही मंत्री, आमदार, खासदार बांधावर येत आहे. तुमची बाजू नीट मांडण्यासाठी बांधावर येत आहे. यावर राजकारण करता कामा नये. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे’.