पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले होते, वाटेतच गाडीला अपघात, एक भाविक ठार

| Updated on: Jun 29, 2023 | 1:09 PM

आषाढी एकादशी असल्याने सहा जण बोलेरो गाडीने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी चालले होते. मात्र पंढरपूरला पोहचण्याआधीच भयंकर घडलं.

पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले होते, वाटेतच गाडीला अपघात, एक भाविक ठार
कार पलटल्याने एकाचा मृत्यू, सहा जखमी
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा : साताऱ्यातील माण तालुक्यात लोधवडे जवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडी पूर्णपणे पलटी झाली. अपघातात गाडीतील 6 प्रवासी जखमी झाले आहेत तर चालकाचा मृत्यू झाला आहे. कल्याण भोसले असे मृत चालकाचे नाव आहे. हे सर्व प्रवासी कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे असल्याची माहिती समोर आली आहे. एका गाडीला ओव्हरटेक करताना गाडी रस्त्यावर अचानक जम्प झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून, चार पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला गाडी गेली. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात हलवले आहे.

ओव्हरटेकच्या करण्याच्या नादात गाडी पलटली

अण्णा गाढवे, दादासो थोरात, सागर भोसले, विजय माने, श्रीमंत पवार आणि रुद्र भोसले अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. आज आषाठी एकादशी असल्याने सर्व जण बोलेरो गाडीने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले होते. यावेळी माण तालुक्यातील लोधवडेजवळ बोलेरो गाडी पलटी झाली. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. मात्र गाडी पलटल्याने गाडीतील सहा जण जखमी झाले, तर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

पाटणमध्ये क्रूझर विहिरीत कोसळली

भरधाव क्रूझर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या शेजारी असलेल्या 35 फूट विहिरीत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज माण तालुक्यात ही घटना घडली. क्रूझर गाडी विहिरीत पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. संभाजी पवार असे मयत चालकाचे नाव आहे. कराड येथून पाटणमधील मल्हारपेठ येथे घरी परतत असताना ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा