मुख्यमंत्री दोन दिवस मु. पो. दरे; वादळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांच्याच गावातील वीज गायब; 105 गावं आऊट ऑफ रेंज

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या गावी येत असल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पाऊस आणि वादळामुळे मुख्यमंत्र्यांच्या गावासह अनेक गावातील वीज गायब झाली आहे. एकनाथ शिंदे येणार असल्यामुळे आता महावितरणकडून वीज प्रवाह सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री दोन दिवस मु. पो. दरे; वादळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांच्याच गावातील वीज गायब; 105 गावं आऊट ऑफ रेंज
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 4:43 PM

मुंबईः शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तब्बल चाळीस दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्र्यांच्या शफथविधीनंतर आता लगेच दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आपल्या दरे (Dare) या गावी दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा 11 व 12 ऑगस्ट रोजी होणार असून दोन ते आपल्या गावी थांबणार आहेत. तर आज महाबळेश्वरमधून (Satara Mahabaleshwar) सायंकाळी सहा वाजता ते तापोळा येथे जाणार आहेत. तापोळा येथील पद्मावती देवीच्या मंदिरात एकनाथ शिंदे यांचा ग्रामस्थांकडून जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील कार्यक्रम करुन ते दरे गावी मुक्कामी जाणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामदैवत जननी देवीच्या मंदिरात देवीच्या मूर्तीला अभिषेक, पूजा व आरती होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पावसामुळे खांब कोसळले

गेल्या दोन दिवसांपासून तापोळा, बामणोली, कांदाटी, खोरे या संपूर्ण परिसरात प्रचड पाऊस कोसळत असल्यामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, त्यामुळे बहुतांश भागात अंधार पसरला आहे.

गावं आऊट ऑफ रेंज

बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने संपूर्ण 105 गावं संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी दौऱ्यावर येत असताना नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमुळे या भागातील वीज व नेटवर्क सेवा ठप्प झाली आहे.

महावितरणकडून युद्धपातळीवर काम

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या गावी येत असल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पाऊस आणि वादळामुळे मुख्यमंत्र्यांच्या गावासह अनेक गावातील वीज गायब झाली आहे. एकनाथ शिंदे येणार असल्यामुळे आता महावितरणकडून वीज प्रवाह सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.