Satara : साताऱ्यातील शॉकिंग हत्याकांड! खून करत JCB ने मृतदेह पुरला, 7 दिवसांनंतर हत्येचं गूढ कसं उकललं?

Satara Crime News : सात दिवसापासून नातेवाईक बेपत्ता बरकत पटेल याचा शोध घेत होते. शुक्रवारी बरकत पटेल याची बहीण परवीन रमजान शेखला आलेल्या संशयामुळे या हत्याकांडाचा खुलासा झाला.

Satara : साताऱ्यातील शॉकिंग हत्याकांड! खून करत JCB ने मृतदेह पुरला, 7 दिवसांनंतर हत्येचं गूढ कसं उकललं?
साताऱ्यातील खळबळजनक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 11:27 AM

सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) खळबळजनक हत्याकांड समोर आलंय. एकाची हत्या करण्यात आली. हत्या (Satara Murder) करुन मृतदेह चक्क जेसीबीच्या (Satara News) मदतीने पुरला. या हत्याकांडाचा खुलासा अखेर सात दिवसांनी झाला आहे. सात दिवसांनी या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका शेतात हत्या केलेला मृतदेह पुरण्यात आला होता. हत्या करणाऱ्यांना कुणाला सुगावा लागू नये म्हणून मृतदेह शेतात पुरला. शेतात मृतदेह पुरण्यासाठी जेसेबीची मदत घेतली. पण अखेर या हत्याकांडाचा उलगडा झाला असून पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघांना अटक देखील केली आहे. दोघा संशियात आरोपींची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. साताऱ्यातील कराड तालुक्यात असलेल्या वहागावात घडलेल्या या हत्याकांडानं एकच खळबळ उडालीये.

थरारक हत्याकांड

अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. खून झाल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर एका शेतात पुरलेला मृतदेह पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने उकरून बाहेर काढलाय. या प्रकरणातील संशयित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. तसंच ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची कसून चौकसीही केली जातेय. बरकत खुद्दबुद्दीन पटेल (वय- 32, रा. वहागाव, ता. कराड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे‌.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 1 जून रोजी तळबीड पोलीस ठाण्यात बरकत पटेल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. दिनांक 28 मे पासून बरकत बेपत्ता असल्याचं पोलीस तक्रारी म्हटलं होतं. सात दिवसापासून नातेवाईक बेपत्ता बरकत पटेल याचा शोध घेत होते. शुक्रवारी बरकत पटेल याची बहीण परवीन रमजान शेखला आलेल्या संशयामुळे या हत्याकांडाचा खुलासा झाला.

हे सुद्धा वाचा

म्हणून घटना उघडकीस आली…

बरकत पटेलच्या बहिणीनं रोहित पवार यांच्या शेतातील ओघळ (ओढा) का बुजवली आहे, असा संशय व्यक्त केला. तसेच बुजवलेला ओढा उकरावा, अशी विनंती पोलिसांना केली. यानंतर तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणची माती जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा 10 ते 15 फूट मातीखाली उकरुन काढल्यानंतर धक्कादायक बाब निदर्शनास आली. जेसेबीच्या मदतीनं बरकत याचा मृतदेह पोलिसांना सापडला.

कराडचे डीवायएपी डॉ. रणजित पाटील, तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत शोध ही मोहीम राबवण्यात आली होती. बरकत पटेल यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच बहीण परवीन शेख यांच्यासह नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. या गुन्ह्यातील दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

का केली हत्या?

कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन रात्री उशिरा करण्यासाठी नेण्यात आला होता. हत्येमागील नेमके कारण काय याबाबत सर्व शक्यतांचा तपास पोलिस करणार करत असून अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्यानं बरकतचा खून करण्यात आला असावा, अशी शंका घेतली जातेय.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.