Satara Murder : सातारा हादरलं! खोलीत हातपाय बांधून संदीपची हत्या करण्यात आल्यानं खळबळ

Satara Crime News : हत्या करणाऱ्या आलेल्या संदीपचे हात मागच्या बाजूने बांधण्यात आले होते.

Satara Murder : सातारा हादरलं! खोलीत हातपाय बांधून संदीपची हत्या करण्यात आल्यानं खळबळ
साताऱ्यात खळबळ
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 23, 2022 | 3:26 PM

सातारा : साताऱ्यात खळबळजनक हत्याकांड (Satara Murder News) घडलंय. एका व्यक्तीची खोलीत हात पाय बांधून हत्या करण्यात आली. हत्या करुन मारेकरी फरार झाल्यानं या हत्येचं गूढ अधिकच वाढलंय. दरम्यान, सातारा पोलिसांडून (Satara Police) या हत्येप्रकरणी सध्या अधिक तपास केला जातो आहे. हा खुन (Satara Crime News) कुणी केला, कोणत्या हेतूने केला, नेमकी या हत्याकांडाची पार्श्वभूमीवर काय अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचं आव्हान सातारा पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. सातारा शहरातील तालीम संघ इथं सकाळच्या सुमारास हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली. तालीम संघ नजीक असलेल्या एका खोलीत एका व्यक्तीची हात पाय बांधून हत्या करण्यात आल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि परिसरात एकच खळबळ माजली. हत्या करुन मारेकरी पसार झाल्यानं अनेक सवाल उपस्थित जाले आहेत.

हत्येचं गूढ

सातारा शहरात बंद खोलीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. हा मृतदेह संदीप मच्छिंद्र दबडे नावाच्या व्यक्तीचा असल्याचं समोर आलं आहे. संदीप दबडेची हत्या करुन मारेकरी फरार झालेत. सध्या संदीप दबडेचा मृतदेह हा पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय. संदीप दबडे या मृत व्यक्तीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनही अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

हत्या करणाऱ्या आलेल्या संदीपचे हात मागच्या बाजूने बांधण्यात आले होते. एका फडक्याने त्यांचे हात बांधण्यात आले होते. तर तोंडात एक कपडाचा बोळा कोंबण्यात आलेला होता. तर त्यांची मान एका दोरीच्या साहाय्याने लटकवण्यात आलेली होती. या खोलीत पूर्णपणे अंधार होता.

तपास सुरु

साताऱ्यातील शहर पोलीस आणि क्राईम ब्रांचची एक टीम या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत लगेचच साताऱ्यातील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला. प्राथमिक माहितीनुसार संदीप यांचे हातपाय बांधून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सध्या या गूढ हत्याकांड प्रकरणी सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत. हत्येचं कारण उलगडण्यापासून हत्या कोणी केली इथपर्यंत सर्वच गोष्टींचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. संदीप यांचे मित्र, नातलग आणि जवळील व्यक्तींकडून पोलीस माहिती गोळा करत असून त्यातून काही धागेदोरे सापडतात का, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत.