राज्यात पुन्हा तीच झाडी अन् तेच डोंगर; ‘गोकुळ’वरून सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, ‘हॉटेलचा रूम नंबर…’

'गोकुळ'वरून सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. बारा संचालकांना दुसऱ्या राज्यात नेल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

राज्यात पुन्हा तीच झाडी अन् तेच डोंगर; गोकुळवरून सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, हॉटेलचा रूम नंबर...
satej patil news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 1:08 PM

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद चांगलाच चिघळला आहे. आता अध्यक्ष निवडीसाठी शेतकऱ्यांचं मॅन्डेट नाकारलं जात असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. महायुती प्रणित आघाडीकडे 12 संचालक आहेत. त्यांच्याकडे बहुमत नसतानाही बहुमत चोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रखडली आहे. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी 12 संचालकांना सुरुवातीला दुसऱ्या राज्यात पाठवलं आहे. त्या 12 संचालकांना सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून इतर राज्यात पाठवण्यात आल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. सतेज पाटलांनी आरोप करत महाराष्ट्राला पुन्हा एकदा ‘तीच झाडी अन् डोंगर… या पलायन राजकारणाची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सतेज पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने जनतेच्या मतांची लोकशाही संपवण्याचा निर्णय घेतलाय. गोकुळला केंद्रबिंदू मानून कायदा बनवला. बहुतेक उद्या ऑर्डिडन्स निघेल. हा कायदा गोकुळ आणि एका दुसऱ्या फेडरेशनमध्ये लागू होईल. ऑर्डडिन्समधून साखर कारखाना, जिल्हा बँका वगळल्या जातील. फक्त गोकुळमध्ये सत्ता मिळवायची. कोल्हापूरकरांनी कौल दिला. तो नाकारण्याचं काम सरकार करत आहे. या कृतीचा निषेध करतो. परंतु कालचा कॅबिनेटमधील निर्णय हा महाराष्ट्रातील इतिहासातील काळा दिवस असणार आहे. एका बाजूला मतदानाचा कौल मानायाचा नाही. दुसरीकडे आमचं 13 चं बहुमत हा तांत्रिक मुद्दा करून स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राची जनता हे बघत आहे. याचं उत्तर उद्याच्या भविष्य काळात सरकारला द्यावे लागेल’.

Loading...

‘साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार या ‘गोकुळ’वर संस्थेवर चालतो. जवळपास दर दहा दिवसांनी 100 कोटी रुपये हे त्यांच्या कष्टाचे दिले जातात. दररोज 20 लाख लीटर गोळा होते. अमुलनंतर गोकुळचा संघ नामाजलेला आहे. हा संघ शेतकऱ्यांच्या ताब्यात राहावा.  देशात शेतकरी अडचणीत आहे. त्याचदरम्यान शेतकऱ्यांचं मॅन्डेटही नाकारण्याचं काम केलं जात आहे. राहुल गांधींनी देखील या प्रकरणाची दखल घेतली, त्याबद्दल साडे पाच लाख शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.  हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांचा ‘गोकुळ’च्या या कारभारामागे हात आहे. दोन्ही नेते पुढाकार घेत आहेत. कायदा बदलण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हे षडयंत्र दोघांच्या माध्यमातून झालं. हा कायदा इतका चुकीचा कसा करू शकता. निवडणुकीच्या आधी हा कायदा असता, तर हे समजू शकलो असतो. निवडणूक झाली. निकाल लागला. निवडणुकीच्या निकालानंतर कायदा आणला. सत्ता मिळवण्यासाठी कायदा आणला. आता दोस्तीत गद्दारी झाली आहे.  शासननियुक्त संचालकपदी तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करण्याची प्रथा असते. परंतु मतदारांनी नाकारलेल्या लोकांची नियुक्ती करण्याचा डाव आखला जात आहे. ते तज्ज्ञ कसे होऊ शकतात, हे मला ठाऊक नाही.  बारा जण आधी गोव्याला होते. नंतर दोन दिवस सूरतला होते. नंतर उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये आहेत. आता रूम नंबर सांगू का? तुम्ही विचारलं तर त्याचीही यादी देतो, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us