औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरु, मात्र मनपा क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

23 नोव्हेंबरपासून औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरातील शाळा मात्र बंदच राहतील. ग्रामीण भागात ऑनलाईन कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्या ठिकाणच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरु, मात्र मनपा क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील काही ठिकाणच्या शाळा सुरु करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. मात्र महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. (Schools in Aurangabad district will start from Monday, but municipal schools remain closed)

23 नोव्हेंबरपासून औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरातील शाळा मात्र बंदच राहतील. ग्रामीण भागात ऑनलाईन कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्या ठिकाणच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 5 हजार 200 शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. त्यात 9 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकही कंटेन्मेंट झोन नसल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील, असं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शाळा बंद

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

नाशिकमधील शाळांबाबत रविवारी निर्णय

नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी 60 हजार विद्यार्थी शाळेला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी 60 हजार विद्यार्थी उपस्थित राहतील.

कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?

 • मुंबई, ठाणे, पनवेल – 31 डिसेंबरपर्यंत बंद
 • नाशिक – रविवारी अंतिम निर्णय
 • पुणे – अद्याप कोणताही निर्णय नाही
 • अहमदनगर – 23 नोव्हेंबरपासून सुरु
 • नागपूर – शाळा सुरु होणार
 • कोल्हापूर – शाळांचं सॅनिटायझेशन सुरु
 • रत्नागिरी- अद्याप कुठलाही निर्णय नाही
 • सिंधुदुर्ग- अद्याप कुठलाही निर्णय नाही
 • रायगड – पनवेल वगळून 23 तारखेपासून शाळा सुरु
 • सोलापूर – सोमवारपासून शाळा सुरु
 • नांदेड – नववी ते बारावीची शाळा सोमवारपासून होणार सुरू
 • बीड -अद्याप कुठलाही निर्णय नाही
 • नंदुरबार – सोमवारी सुरू होणार

संबंधित बातम्या:

नाशिकमधील शाळा सुरु की निर्णय पुढे ढकलावा, उद्या तातडीची बैठक : छगन भुजबळ

Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

Schools in Aurangabad district will start from Monday, but municipal schools remain closed

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *