AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?

राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे.

Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?
| Updated on: Nov 21, 2020 | 5:20 PM
Share

मुंबई : कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून (school reopen) सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Sarkar) घेतला आहे. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा?, पालकांची संमती कशी मिळवायची?, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी कशी घ्यायची? शिवाय 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी 50 टक्के विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन असेल, ते मॅनेज कसं करायचा असा प्रश्न शिक्षक आणि प्रशासमोर आहे. (Maharashtra school reopening date)

वाचा :  School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह? 

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अन्य जिल्ह्यात शाळा सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरु होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र महापालिका क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहतील असं, पालिका आयुक्तांनी सांगितलं.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शाळा बंद

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यात 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद 

‘पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार’, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती, 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार, पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय, पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंदच राहणार

नाशिकमधीळा शाळांबाबत रविवारी निर्णय

नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी 60 हजार विद्यार्थी शाळेला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी 60 हजार विद्यार्थी उपस्थित राहतील.

कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?

  • मुंबई, ठाणे, पनवेल – 31 डिसेंबरपर्यंत बंद
  • नाशिक – रविवारी अंतिम निर्णय
  • पुणे – 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद
  • अहमदनगर – 23 नोव्हेंबरपासून सुरु
  • नागपूर – शाळा सुरु होणार
  • कोल्हापूर – शाळांचं सॅनिटायझेशन सुरु
  • रत्नागिरी- अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • सिंधुदुर्ग- अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • रायगड – पनवेल वगळून 23 तारखेपासून शाळा सुरु
  • सोलापूर – सोमवारपासून शाळा सुरु
  • औरंगाबाद – शहरातील शाळा  3 जानेवारीपर्यंत बंद राहणार
  • नांदेड – नववी ते बारावीची शाळा सोमवारपासून होणार सुरू
  • बीड -अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • नंदुरबार – सोमवारी सुरू होणार

(Maharashtra school reopening date)

संबंधित बातम्या  

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती 

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.