सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का? लवासा आणि ‘अँबी व्हॅली सिटी’ वेळी आंदोलने का नाहीत?, मंत्री मेघना बोर्डिकर मैदानात

लोणावळा परिसरात १०, ६०० एकरवर ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली, तेव्हा आंदोलन झालं नाही. तेव्हा निसर्ग तुमचा सोयरा नव्हता का? असाही सवाल मंत्री मेघना बोर्डिकर यांनी केला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का? लवासा आणि ‘अँबी व्हॅली सिटी’ वेळी आंदोलने का नाहीत?, मंत्री मेघना बोर्डिकर मैदानात
Meghna Bordikar
| Updated on: Oct 26, 2026 | 4:54 PM

भिमाशंकर परिसरात ६०० एकरावर जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु झाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकरणात सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का ? असा सवाल केला आहे. लव्हासा आणि ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली तेव्हा आंदोलने झाली नाहीत, आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विद्युत प्रकल्प राबवला जात आहे तर त्याला विरोध का असा सवालच बोर्डीकर यांनी सोशल मीडियावर केला आहे.

राज्य सरकारने भिमाशंकर परिसरात मोठा जलविद्युत प्रकल्प साकारण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु झाली आहे. या विरोधात आता विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. आदित्य ठाकरे यांनी कर्जत येथे प्रकल्पस्थळी भेट देऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे. या संदर्भात आता सरकारच्या बाजूने मंत्री मेघना बोर्डीकर मैदानात उतरल्या आहेत.

Loading...

येथे पोस्ट वाचा –

मेघना बोर्डीकर यांची पोस्ट काय ?

सह्याद्रीच्या पोटात मुळशीतील २५ हजार एकरवर ‘लवासा’ झालं.

लोणावळा परिसरात १०, ६०० एकरवर ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली, तेव्हा आंदोलन झालं नाही. तेव्हा निसर्ग तुमचा सोयरा नव्हता का? असाही सवाल मंत्री मेघना बोर्डिकर यांनी केला आहे.

कर्जत उरणसह भिमाशंकर परिसरात ६०० एकरवर जलविद्युत प्रकल्प होतोय. शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. कोळश्यावर तयार होणाऱ्या विद्युत निर्मितीवर हा निसर्गपूरक पर्याय आहे.

निसर्गातच निसर्गपूरक प्रकल्प तयार होतोय,

एकच धंदा, काहीही करून पायात पाय अडकवून पाडायचं!

महाराष्ट्राला मागं खेचायचं…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,
महायुतीचा प्रकल्प असला की
थयथया नाच रे…

मोठे प्रकल्प = शांतता…
छोटे प्रकल्प = आंदोलन???

विकास हवा की फक्त सिलेक्टिव्ह विरोध?

सह्याद्री वाचवाच… विकासाला साथ द्या!
@BJP4Maharashtra

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us