पवारांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा डिलिमिटेशनला पाठिंबा, मविआत भूकंप..
डिलिमिटेशन बिलावरून मोठा वाद पेटला आहे. इंडिया आघाडीकडून या बिलाला जोरदार विरोध केला जात आहे. मात्र, शरद पवारांच्या पक्षाचे खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यात घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यातच काँग्रेसकडे जोरदार टीका केली जात आहे. शरद पवारांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचा मोठा आरोप काँग्रेसने केला. इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे बघायला मिळत आहे. शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली जात आहे. संजय राऊतही बोलताना दिसले. डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध आहे. त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. एकही शरद पवार यांच्या गटाचा खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याचे कालच पक्षाकडून जाहीर करण्यात आले. इंडिया आघाडीतून शरद पवारांचा पक्ष बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. त्यातच आता डिलिमिटेशनबद्दल ही भूमिका घेतली जात आहे.
काँग्रेसचा डिलिमिटेशनला जोरदार विरोध आहे. त्यातच आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने थेट डिलिमिटेशनला पाठिंबा दिला. डिलिमिटेशन बिलावरून सुशीलकुमार शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे. माझं मत आहे, डिलिमिटेशन व्हायला पाहिजे. वेळ खूप निघून गेलेला आहे. लोकसंख्या जशी वाढते तसे प्रतिनिधी मिळायला पाहिजेत.
त्यामुळे डिलिमिटेशन होणं जरुरीच आहे. राष्ट्रवादी शरद पवारांच्या भूमिकेवर बोलताना मोठे विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, त्यावर मी बोलू शकत नाही आमचा आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे. डिलिमिटेशनवर बोलताना त्यांनी म्हटले, माझं मत आहे, डिलिमिटेशन व्हायला पाहिजे.
वेळ खूप निघून गेलेला आहे. लोकसंख्या जशी वाढते तसे प्रतिनिधी मिळायला पाहिजेत. त्यामुळे डिलिमिटेशन होणे जरुरीच आहे. आमच्या पक्षाची ती भूमिका आहे की, 2011 च्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही डीलिमिटेशन करून त्याप्रमाणे करावं. परंतु, आता काळ पुढे गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डिलिमिटेशन सर्व संमतीने झाल असता तर फार बरं झालं असतं, असेही सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले.