Explain Delimitation Bill: डिलिमिटेशन म्हणजे काय? विधेयक मंजुरीसाठी किती संख्याबळ आवश्यक?
Explain Delimitation Bill: संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पुन्हा चर्चा झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमके काय आणि त्याद्वारे लोकसभा व राज्यसभेच्या जागा कशा निश्चित केल्या जातात, हे आपण जाणून घेऊया.

संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेकयाद्वारे लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याबाबतही चर्चा झाली. मोदी मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेकशीसंबंधित संविधान दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यात सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, या दरम्यान हे जाणून घेणेही आवश्यक ठरते की, मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमके काय आणि याद्वारे लोकसभा व विधानसभाच्या जागा कशा वाढतात किंवा ठरवल्या जातात.
मतदारसंघ पुनररचना म्हणजे काय आणि ते का केले जाते?
मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे एखाद्या देशात किंवा राज्यात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या सीमा ठरवणे किंवा त्या वाढवणे-घटवणे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, कोणता भाग कोणत्या खासदार किंवा आमदाराच्या क्षेत्रात येईल हे ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे मतदारसंघ पुनररचना. आता प्रश्न आहे की, मतदारसंघ पुनर्रचना का केली जाते? कारण काळानुसार लोकसंख्या कमी-जास्त होत राहते. एखाद्या क्षेत्रात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल आणि दुसऱ्या क्षेत्रात कमी असेल तर प्रतिनिधित्व असमान होते. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा अर्थ प्रत्येक क्षेत्रात समान प्रमाणात लोकसंख्या राखणे असा होतो.
या लोकसंख्येच्या आधारेच एससी आणि एसटींसाठी राखीव जागांची संख्याही ठरवली जाते. मतदारसंघ पुनर्रचनाद्वारे सीमांचे स्पष्ट क्षेत्र ठरते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक बनते.
मतदारसंघ पुनर्रचना कोण आणि कसे करते?
भारतात मतदारसंघ पुनररचनेचे काम स्वतंत्र आणि उच्चाधिकारप्राप्त संस्था म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आयोग करते. कायद्यानुसार याची स्थापना राष्ट्रपतींद्वारे केली जाते. या आयोगात सामान्यतः सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि त्या राज्याचे निवडणूक आयुक्त यांचा समावेश असतो.
लोकसभा-विधानसभाच्या जागा कशा ठरवल्या जातात?
मतदारसंघ पुनर्रचनाबाबत संविधान सांगते की, ज्या राज्यात जितकी लोकसंख्या असेल, तितक्याच प्रमाणात त्या राज्यांना विधानसभा आणि लोकसभेच्या जागा दिल्या जातात. ४२व्या आणि ८४व्या संविधान दुरुस्तीनुसार, १९७१ च्या जनगणनेच्या आधारे २०२६ नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत एकूण जागांची संख्या स्थिर ठेवण्यात आली होती. संविधानाचे अनुच्छेद ८२ सांगतो की, संसदच परिसीमन कायदा करते आणि कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आकड्यांचा मतदारसंघ पुनर्रचनासाठी वापर केला जाईल हेही ठरवते.
मतदारसंघांच्या सीमा कशा बदलतात?
याअंतर्गत प्रत्येक राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात लोकसंख्या समान ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विधानसभा क्षेत्र सामान्यतः एकाच लोकसभा क्षेत्रात येते. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना अशा पद्धतीने केले जाते की एक विधानसभा क्षेत्र एकापेक्षा जास्त जिल्ह्यांत विभागले जाऊ नये. क्षेत्रांच्या भौगोलिक आणि प्रशासकीय घटकांचाही विचार केला जातो.
राखीव जागा कशा ठरवल्या जातात?
अनुच्छेद ३३० आणि ३३२ नुसार, लोकसंख्येच्या प्रमाणातच एससी आणि एसटींच्या जागा राखीव ठेवल्या जातात. एसटीच्या जागा त्या क्षेत्रात ठेवल्या जातात, जिथे त्यांची जनजातीय लोकसंख्या सर्वाधिक असते. एससी लोकसंख्येच्या जागाही याच पद्धतीने राखीव केल्या जातात.
दिल्लीत संसदेचे अधिवेशन
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा येत्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होईल. या अधिवेशनात महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. हे विधेयक यापूर्वीही मांडले गेले होते, मात्र बहुमताअभावी मंजूर होऊ शकले नव्हते. यावेळी मात्र विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव सरकारने केल्याचे दिसते.
हे विधेयक घटनादुरुस्ती स्वरूपाचे असल्याने त्याला संसदेत मंजुरीसाठी किमान ३६० मतं आवश्यक आहेत.
संसदेतील एनडीएचे सध्याचे संख्याबळ – ३२१
– भाजप: २४१
– तेलुगू देसम पक्ष: १६
– शिवसेना (एकनाथ शिंदे): १३
– जनता दल (युनायटेड): १२
– लोक जनशक्ती पक्ष (रामविलास): ५
– जनता दल (धर्मनिरपेक्ष): २
– जनसेना पक्ष: २
– राष्ट्रीय लोकदल: २
– अपना दल (एस): १
– आसाम गण परिषद: १
– एजेएसयू पक्ष: १
– हिंदुस्तानी अवाम मोर्चा: १
– राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): १
– सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा: १
– यूपीपीएल: १
– एनसीपीआय (तृणमूलमधून बाहेर पडलेले): २०
– शिरोमणी अकाली दल: १
एकूण: ३२१
एनडीएबाहेरील संभाव्य समर्थक (मागील वेळी मदत केलेले)
– वायएसआर काँग्रेस: ४
– अपक्ष: १
यासह एकूण संख्याबळ ३२६ पर्यंत पोहोचते.
याशिवाय द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचे समर्थन मिळाल्यास एनडीएला बहुमताचा आकडा गाठणे सोपे होईल.
– द्रमुक: २२
– राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार): ८
यासह एकूण संभाव्य संख्याबळ: ३५६
अशा प्रकारे सरकारने या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते.
