AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीला मोठा झटका? 22 खासदारांचा सर्वात मोठा पक्ष एनडीएत? भाजपाला दिलासा

डिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण 22 खासदारांचा डीएमके पक्ष NDA मध्ये सामील होण्याचे संकेत देत आहे. डीलिमिटेशन बिलावरून आघाडीत फूट पडली असून, डीएमके भाजपला पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याचे दिसते. ही घडामोड मोदी सरकारविरोधातील आघाडीसाठी एक मोठा झटका असून भाजपसाठी दिलासादायक आहे.

इंडिया आघाडीला मोठा झटका? 22 खासदारांचा सर्वात मोठा पक्ष एनडीएत? भाजपाला दिलासा
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 10:21 AM
Share

केंद्रातील मोदी सरकारला हटवण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीतच डीलिमिटेशन बिलावरून मोठी फूट पडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिला आहे. त्यापाठोपाठ आता इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. 22 खासदारांचं बळ असलेला डीएमके पक्ष डीमिलिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच या घडामोडी घडत असल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे.

डीएमकेने अधिकृतपणे इंडिया आघाडी सोडलेली नाही. परंतु, तामिळनाडूच्या निवडणुकीनंतर डीएमकेने इंडिया आघाडीपासून दूरच राहणं पसंत केलं आहे. मात्र, असं असलं तरी आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला डीएमकेला पाचारण केलं आहे. डीएमके या बैठकीला हजर राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

डीएमकेच्या अनेक टर्मपासून खासदार राहिलेल्या एका नेत्याने तर राजकारणात काहीच अशक्य नसल्याचं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस आणि डीएमके दरम्यान 2004मध्ये आघाडी झाली होती. त्यापूर्वी दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते, असं या नेत्याने सांगून भाजपसोबत जाण्याचे संकेतच दिले आहेत.

भाजप आणि डीएमकेची युती

भाजप आणि डीएमके यापूर्वीही एकत्र आलेले आहेत. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वातील सत्तेतही डीएमके होता. मात्र, 2003 नंतर डीएमकेने आपला मार्ग बदलला. त्यानंतर बीजेपीने डीएमकेचा राजकीय स्पर्धक असलेल्या एआयएडीएमकेचा हात धरला. वैचारिक मतभेद असतानाही त्यावेळी डीएमकेने भाजपसोबत सत्तेत भागिदारी केली होती.

डीएमके समोरचं आव्हान काय?

डीएमके इंडिया आघाडीचा घटक होता. परंतु, तामिळनाडूत झालेल्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर डीएमकेने इंडिया आघाडीपासून दूर राहणंच पसंत केलं. काँग्रेसने डीएमकेशी युती असतानाही विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याने डीएमके नाराज होता. डीएमकेला राजकीय पर्यायाची गरज होती. भाजपच्या माध्यमातून डीएमकेला हा पर्याय मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

तथापि, डीएमकेमधील एक वर्ग भाजपच्या विरोधात आहे. तर, दुसरीकडे भाजपही डीएमकेच्या हिंदुत्वविरोधी राजकारणावर टीका करत असते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष वैचारिक मतभेद असूनही राजकीय गरजेपोटी एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे. परिसीमन बिलाच्या माध्यमातून डीएमकेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. डीएमके सारखा मोठा पक्ष भाजपसोबत येत असल्याने 2029च्या निवडणुकीसाठी भाजपला मोठ्या फायद्याचं ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?
विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
Saamana On Delimitation Bill : विधेयकामुळे महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा पीएम कधीच होणार नाही- सामना
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून...
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय चर्चांना नवं वळण
.....मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण
Congress On Sharad Pawar : शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने जागा सोडली, मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?