2011 सालाआधीची सर्व अतिक्रमणं नियमित होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, उचललं महत्त्वाचं पाऊल!
देवेंद्र फडणवीस सरकारने लोककल्याणकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. या प्रक्रियेला वेग आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधानसभास्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

Maharashtra Government Decision : राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2011 सालापर्यंतची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणं नियमित होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा स्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. लोकांना आपल्या हक्काची घर मिळणार आहे.
सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
समोर आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने लोककल्याणकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. या प्रक्रियेला वेग आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधानसभास्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यभरात 115 सहअध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत.
निर्णयाचा काय फायदा होणार?
या निर्णयामुळे राज्यातील लाखो सर्वसामान्य कुटुंबांच्या डोक्यावरील बेघर होण्याची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. घरांना कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्यात सरकारच्या मालकीची लाखो एकर जमीन आहे. यातील काही जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण करून लोकांनी इथं घरं बांधलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोक आपल्या घरात राहतात. परंतु अतिक्रमित जागा असल्याने आमचे घर कधीही पाडले जाईल, अशी भीती या लोकांना होता. त्यामुळे आमची घरं न पाडता जमिनी आमच्या मालकी हक्काच्या कराव्यात अशी मागणी केली जायची. नागरिकांची हीच मागणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
इतर काही अटी असणार का?
दरम्यान, 2011 अगोदरची सर्व निवासी अतिक्रमणं नियमित होणार आहेत. सध्यातरी या निर्णयाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही. या निर्णयाचा किती लोकांना फायदा होणार. लाभा मिळवण्यासाठी इतर कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार, हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
