AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्यासाठी आनंदाची बातमी, थेट आंदोलकांवर..

कॉकरोच जनता पार्टीचे दुपारी शिवाजी पार्कात आंदोलन आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. मात्र, अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम आहेत. स्थानिक लोक या आंदोलनाला जोरदार विरोध करताना दिसत आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येतंय.

मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्यासाठी आनंदाची बातमी, थेट आंदोलकांवर..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 02, 2026 | 10:53 AM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे. मुंबईत आज अभिजीत दिपके आंदोलन करणार आहेत. शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही. परवानगी नसतानाही अभिजीत दिपके यांच्याकडून आंदोलन केले जाणार आहे. दिल्लीतही मोठ्या घडामोडी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळत आहेत. जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. हेच नाही तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. पोलिस आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मुंबईत आंदोलनाला परवानगी नसतानाही आंदोलन करण्याच्या भूमिकेत अभिजीत दिपके आहेत. अभिजीत दिपके आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईतच आहेत.

अभिजीत दिपके यांच्या शिवाजी पार्कातील आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात आहे.  यासोबतच परवानगी नसताना शिवाजी पार्कात आंदोलनाला बसल्याने पोलिस गुन्हे दाखल करू शकतात. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीजेपी आंदोलनाच्या करण्यावर ठाम असताना स्थानिक नागरिक जोरदार विरोध करत आहेत. त्यातच आता वसईचे वकील दिगंबर देसाई यांनी मोठे विधान केले.

दिगंबर देसाई यांनी म्हटले की, सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर त्यांच्या केस मी मोफत लढणार आहे. वसईचे वरिष्ठ वकील दिगंबर देसाई यांनी हा मोठा निर्णय घेतला. परवानगी नसल्याने पोलिस सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ शकतात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहे. यावेळी कॉकरोच जनता पार्टीला मिळणाऱ्या पैशांवर अभिजीत दिपके यांना प्रश्न विचारण्यात आला.

कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्याच प्रकारचे मोठे आंदोलन उभारताना दिसत आहे. अभिजीत दिपके हा अरविंद केजरीवाल याचा माणूस असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. तसा आरोपही केली जात आहे. अमेरिकेला जाण्यापूर्वी अभिजीत दिपके हे अरविंद केजरीवाल यांचे काम करत होते. आता जंतर मंतरवर कार्यकर्ते जमत आहेत. चार वाजता आंदोलनाला सुरूवात होईल.

Follow Us
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट