मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्यासाठी आनंदाची बातमी, थेट आंदोलकांवर..
कॉकरोच जनता पार्टीचे दुपारी शिवाजी पार्कात आंदोलन आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. मात्र, अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम आहेत. स्थानिक लोक या आंदोलनाला जोरदार विरोध करताना दिसत आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येतंय.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे. मुंबईत आज अभिजीत दिपके आंदोलन करणार आहेत. शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही. परवानगी नसतानाही अभिजीत दिपके यांच्याकडून आंदोलन केले जाणार आहे. दिल्लीतही मोठ्या घडामोडी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळत आहेत. जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. हेच नाही तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. पोलिस आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मुंबईत आंदोलनाला परवानगी नसतानाही आंदोलन करण्याच्या भूमिकेत अभिजीत दिपके आहेत. अभिजीत दिपके आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईतच आहेत.
अभिजीत दिपके यांच्या शिवाजी पार्कातील आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात आहे. यासोबतच परवानगी नसताना शिवाजी पार्कात आंदोलनाला बसल्याने पोलिस गुन्हे दाखल करू शकतात. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीजेपी आंदोलनाच्या करण्यावर ठाम असताना स्थानिक नागरिक जोरदार विरोध करत आहेत. त्यातच आता वसईचे वकील दिगंबर देसाई यांनी मोठे विधान केले.
दिगंबर देसाई यांनी म्हटले की, सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर त्यांच्या केस मी मोफत लढणार आहे. वसईचे वरिष्ठ वकील दिगंबर देसाई यांनी हा मोठा निर्णय घेतला. परवानगी नसल्याने पोलिस सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ शकतात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहे. यावेळी कॉकरोच जनता पार्टीला मिळणाऱ्या पैशांवर अभिजीत दिपके यांना प्रश्न विचारण्यात आला.
कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्याच प्रकारचे मोठे आंदोलन उभारताना दिसत आहे. अभिजीत दिपके हा अरविंद केजरीवाल याचा माणूस असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. तसा आरोपही केली जात आहे. अमेरिकेला जाण्यापूर्वी अभिजीत दिपके हे अरविंद केजरीवाल यांचे काम करत होते. आता जंतर मंतरवर कार्यकर्ते जमत आहेत. चार वाजता आंदोलनाला सुरूवात होईल.