उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं

बीड जिल्ह्यातील गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य नर्तिकेचे देखील या सेक्स रॅकेटमध्ये नाव आले आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच... सेक्स रॅकेटने शहरच हादरलं
गोविंद बर्गे
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 2:27 PM

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५ मार्च रोजी या कला केंद्रावर छापा टाकून २५ तरुणींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकीचे नाव

मात्र, या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे बीड जिल्ह्यातील गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य नर्तिकेचा समावेश पिडित महिलांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. सासुरवाडी (ता. बार्शी) येथे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या उपसरपंच बर्गे यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेली ही नर्तिका मोडनिंब येथील कला केंद्रात वेश्याव्यवसायात अडकलेली आढळली. या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

कलाकेंद्राच्या नावाखाली काळे धंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्वरांजली कला केंद्र’ हे फक्त नाव होते. पण त्यामागे अनेक काळेधंदे सुरु होते. प्रत्यक्षात येथे तरुणींना नृत्य, गायन यांच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मोठे रॅकेट चालत होते. कित्येक महिन्यांपासून हे काळे धंदे राजरोस सुरू होते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे केंद्र मोडनिंब आऊटपोस्ट पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच होते. तरीही पोलिसांना याची कुणकुण लागली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आयपीएस अधिकारी राहुल आत्राम यांच्या पथकाने केलेल्या धाडीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल, रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पिडित तरुणींना बाहेरून आणून येथे कोंडून ठेवण्यात येत होते. त्यांना नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसमोर उभे करून अनैतिक कामे करायला भाग पाडले जात होते.
या प्रकरणाने माढा-बार्शी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. उपसरपंच बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आधीच खळबळ उडाली होती. आता त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली आढळल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Follow Us