शनी शिंगणापूर देवस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची वर्णी

| Updated on: Dec 23, 2020 | 5:20 PM

शनी शिंगणापूर देवस्थानची विश्वस्त मंडळ जाहीर झाली आहे (Shani Shingnapur board of trustees declare).

शनी शिंगणापूर देवस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची वर्णी
Follow us on

अहमदनगर : शनी शिंगणापूर देवस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर झाली आहे. अहमदनगर धर्मदाय आयुक्तांनी 11 सदस्यीय विश्वस्त मंडळांची कार्यकारिणी जाहीर केली. मंडळाच्या कार्यकारिणीसाठी 84 ग्रामस्थांनी मुलाखती दिल्या होत्या. मुलाखती नंतर 11 सदस्यीय विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे निवड करण्यात आलेले सर्व सदस्य हे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. ही विश्वस्त मंडळ 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2026 या‌ पाच वर्षांसाठी कार्यरत असणार आहे (Shani Shingnapur board of trustees declare).

निवड झालेल्या 11 सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे:

1) बाळासाहेब बन्सी बोरुडे
2) विकास नानासाहेब बानकर
3) छबुराव नामदेव भूतकर
4) पोपट लक्ष्मण कुऱ्हाट
5) शहाराम रावसाहेब दरंदले
6) भागवत सोपानराव बानकर
7) सुनीता विठ्ठल आढाव
8) दीपक दादासाहेब दरंदले
9) शिवाजी अण्णासाहेब दरंदले
10) पोपट रामचंद्र शेटे
11) आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदू धर्माची परंपरा राखली : गडाख

दरम्यान, नवीन विश्वस्त मंडळ जाहीर झाल्यानंतर शंकरराव गडाख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “देवस्थान नावारूपाला आणण्यासाठी या गावातील प्रत्येक कुटुंबाचा त्याग आहे. परंपरा जपण्यासाठी गावकरी बिगर दरवाजाच्या घरात राहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्माची परंपरा राखण्याचं काम केलं आहे”, असं शंकरराव गडाख म्हणाले.

“पानासनाला प्रकल्पचा लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. येथील विकासासाठी विविध उद्योगपतींशी चर्चा करून सीएसआर फुंडातून येथे काम करण्यात येणार आहे”, अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस