शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचे ट्वीट, म्हणाले “तुम्हाला दीर्घायुष्य…”

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचे ट्वीट, म्हणाले तुम्हाला दीर्घायुष्य...
शरद पवार, अजित पवार
Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 12, 2024 | 9:58 AM

Sharad Pawar Birthday Ajit Pawar tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी 85वा वाढदिवस आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून शरद पवारांनी राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. भारतातील सर्वाधिक संसदीय कारकिर्द असलेले नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. गेल्या 50 पेक्षा जास्त काळ ते राजकारणात सक्रीय आहेत. शरद पवारांनी अनेक मंत्रि‍पदावर काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्रि‍पदावर काम केले आहे. तसेच शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींकडून ट्वीट करत शुभेच्छा

अजित पवारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अजित पवार-शरद पवारांची भेट होणार का?

दरम्यान अजित पवार यांनी 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी अजित पवारांसोबत ४० आमदारांनीही शरद पवारांची साथ सोडली. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह काढून घेऊन ते अजित पवारांना देण्यात आले. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात मोठा दुरावा निर्माण झाला होता. त्यातच आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेते दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या वाढदिवशी काका-पुतण्याची भेट होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.