AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार, घेतला सर्वात मोठा निर्णय

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली आहे, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार, घेतला सर्वात मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 6:26 PM
Share

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील खासदार आणि आमदार उपस्थित होते, या बैठकीमध्ये राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत देखील चर्चा करण्यात आली.

दरम्यान या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या तरुणांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा तरुणांना एकूण जागांपैकी 50  टक्के जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार आहे.  जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल, ते बघा अशा सूचना या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती देखील या बैठकीमध्ये देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर देखील या बैठकीमध्ये शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  कधिकाळी एक आमदार आपल्या सोबत होता, पण तो आता काय वक्तव्य करत आहे हे सगळं माध्यमांवर येत आहे, त्यामुळे आपल्याला जातीय सलोखा बिघडवायचा नाही,  जातीय सलोखा ठेवा, अशा सूचना या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  सरकारमधील काही नेते व मंत्री सध्या वादग्रस्त बोलत आहेत, मात्र आपण बोलताना प्रेमाची भाषा वापरा अशा सूचनाही यावेळी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...