सोलापुरात काहीतरी मोठं घडणार? मंत्रि‍पदाच्या ऑफरवर शरद पवारांच्या आमदाराची बोलकी प्रतिक्रिया; म्हणाले…

सोलापुरात काहीतरी मोठं घडण्याची चर्चा आहे. मंत्रि‍पदाच्या ऑफरवर शरद पवारांच्या आमदाराने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या विधानाने सस्पेन्स वाढला आहे.

सोलापुरात काहीतरी मोठं घडणार? मंत्रि‍पदाच्या ऑफरवर शरद पवारांच्या आमदाराची बोलकी प्रतिक्रिया; म्हणाले...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 12:20 PM

राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर 3:0 सुरू झालं आहे. या ऑपरेशन टायगरदम्यान मंत्री भरत गोगावले यांनी थेट शरद पवारांच्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफर दिली होती. या ऑफरवर शरद पवारांच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या विधानाने सस्पेन्स वाढला आहे.

शिंदे गटाने आमदार अभिजीत पाटील यांना मंत्रि‍पदाची ऑफर दिली होती. या  ऑफरवर आमदार अभिजीत पाटील म्हणाले, ‘पाडूरंगाच्या मनात असेल तर सगळ्या गोष्टी होतील. मला मंत्रिपदाची ऑफर दिली जाते. हे माझ्यासाठी फार मोठं आहे. सोलापूर जिल्हातील राष्ट्रवादीच्या 4 आमदाराच्या बाबतीतच शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चा घडत आहेत. मात्र चर्चा चुकीच्या आहेत’.

Loading...

पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणावर आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात बिहार सारखे प्रकार घडू नयेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपदाची धुरा घ्यावी. तसेच राज्यभरातील गुन्हेगारी नेस्तनामूत करुन जरब बसवण्याची गरज आहे’. अभिजीत पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली. ‘आम्ही पक्षाच्या लाईनवर आहोत. रोहित पवार पक्षात आहेत का? त्यांनी विचार करावा, असा थेट सवाल आमदार अभिजीत पाटील यांनी रोहित पवार यांना केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार,सुप्रिया सुळे,शशिकांत शिंदे,जयंत पाटील हेच वरिष्ठ नेते आहेत’.

रोहित पवारांनी काल सुनेत्रा पवारांवर टीका केली होती. त्यावर आमदार पाटील म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांना काम करायला वेळ देणं गरजेचं आहे. लगेच त्यांच्या कामाबद्दल बोलणं योग्य नाही’. तर रोहित पवारांच्या अधिवेशनावरील मोर्चावर पाटील म्हणाले, ‘मोर्चा जर पक्षाचा असेल, तरच आम्ही सगळे आमदार उपस्थित राहू. पक्षाने सांगितले. तरच मोर्चात सहभागी होईल’.  शरद पवार गट एनडीएसोबत हातमिळवणी करणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर अभिजीत पाटील म्हणाले, सध्या सगळीकडे  चर्चा सुरु आहेत. मात्र पक्षात अद्याप तरी अधिकृत चर्चा  झालेली नाही. मात्र पक्ष निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेईन’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us