Pune MLC Graduate Election Result : पुणे पदवीधरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का, स्मीता जाधव यांचा पराभव, हर्षदा जाधव यांचा दणदणीत विजय!

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार  स्मीता जाधव पराभूत झाल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासनूच स्मीता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

Pune MLC Graduate Election Result : पुणे पदवीधरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का, स्मीता जाधव  यांचा पराभव, हर्षदा जाधव यांचा दणदणीत विजय!
HARSHADA JADHAV AND SMITA JADHAV
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 5:29 PM

Pune Graduate MLC Election Result Declared : पुणे पदवीधर मतदाररसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती. सोबतच ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या बड्या नेत्यांनीही जोर लावला होता. परंतु या जागेवरून भाजपाच्या उमेदवार स्मीता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवर हर्षदा जाधव यांचा तब्बल 9700 मतांनी विजय झालाय.

हर्षदा जाधव यांचा विजय, भाजपाला धक्का

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार  स्मीता जाधव पराभूत झाल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासनूच स्मीता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. परंतु नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. या निवडणुकीत हर्षदा जाधव यांना 1 लाख 13 हजार 95 मतं मिळाली. त्यांना स्मीता जाधव यांच्यापेक्षा 9700 मतं जास्त मिळाली.

Loading...

एका जागेवर विजय, एका जागेवर पराभव

या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासोबतच पुणे शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक झाली होती. हे दोन्ही मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ला मानले जातात. या दोन्ही जागांवर आमचाच विजय होईल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात होता. परंतु आता भाजपाला शिक्षक मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला असला तरीही पदवीधर मतदारसंघात मात्र भाजपाचा पराभव झालाय. गड आला पण सिंह गेला अशी स्थिती भाजपाची आहे.

सुनील मोदी यांनीही लढवली निवडणूक पण…

पुणे पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेही आपला उमेदवार उभा केला होता. ही जागा जिंकण्यासाठी या पक्षानेही जोर लावला होता. परंतु शिवसेनेच्या सुनील मोदी यांना 3066 मतं मिळाली. सुनील मोदी यांच्यामुळे हर्षदा जाधव यांना मिळणारी मतं विभागली जातील आणि त्याचा फायदा भाजपाच्या स्मीता वाघ यांना होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु सुनील मोदी यांनी निवडणूक लढवलेली असूनही हर्षदा जाधव यांची आघाडी कायम राहिली. त्यांचा विजय झाला असून भाजपासाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जातेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us