NCP News: शरद पवारांनी भाकरी फिरवली! थेट प्रदेशाध्यक्ष बदलल्या; राष्ट्रवादीत नव्या चेहऱ्यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य मुंबई महिला अध्यक्ष पदी संगीता वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगीता वाझे यांची राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Sharad Pawar NCP News: राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे रोहित पवार यांनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचीही चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीत मोठे बदल
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य मुंबई महिला अध्यक्ष पदी संगीता वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगीता वाझे यांची राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे. “पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, मुंबईतील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल असा विश्वास आहे,”असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.
‘एकला चलो’ची चाचपणी, रोहित पवारांनी दिले स्पष्टीकरण?
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी शेतकरी न्याय हक्क मोर्चाचे आयोजन केले आहे, मात्र यामध्ये त्यांनी पक्षाचे चिन्ह, झेंडा न वापरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. रोहित पवार यांच्या या खेळीमागे एकला चलोची भूमिका आहे का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र रोहित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलनाला राजकीय वळण लागू नये म्हणून पक्षाचा झेंडा वापरत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.