Sharad Pawar Ncp Support Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांनी इंडिया आघाडीला झटका दिल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar Ncp Support Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांनी आज काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला झटका दिला. पवारांच्या राष्ट्रवादीने विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासदारांना व्हिप सुद्धा बजावला आहे.

Sharad Pawar Ncp Support Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांनी इंडिया आघाडीला झटका दिल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar
| Updated on: Nov 27, 2026 | 6:52 PM

शरद पवार हे केवळ विरोधासाठी विरोध करत नाहीत. एखादा देशहिताचा, समाजहिताचा विषय असेल तर ते प्रसंगी विरोधात जाऊन निर्णय घेतात. आता शरद पवार यांनी मतदारसंघ पूनर्रचना विधेयकाच्या बाबतीत हीच भूमिका घेतली आहे. मोदी सरकारने संसदेच विशेष अधिवेश बोलावलं आहे. त्या अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाऊ शकतं. भाजप आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी हे दोन्ही परस्पर विरोधी विचारधारेचे पक्ष आहेत. पण डिलिमिटेशनच्या मुद्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेत विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली. आता आम्ही हे म्हणायला हरकत नाही की, ही भूमिका दुर्देवी आहे. मोदी सरकारला मदत करणारी आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला पाहिजे होता” असं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलय.

“मोदी सरकारचं विधेयक मागच्या अधिवेशनात पडलं, त्यांचा पराभव झालेला, त्यावेळी इंडिया आघाडीतले घटक पक्ष एकत्र होते. त्यानंतर पक्ष फोडण्याची प्रक्रिया सुरु झाली. ते मोदी सरकारचं षडयंत्र होतं. राष्ट्रवादी काँग्रेस त्याला बळी पडली. त्याची चिंता वाटते. इंडिया आघाडीत आज राहुल गांधी यांनी त्या संदर्भात टि्वट केलं. भूमिका मांडली. छोट्या पक्षांवर दबाव येत आहे असं म्हटलं” असं सचिन सावंत म्हणाले.

Loading...

आधी आम्हाला शंका होती

“या भूमिकेमुळे हुकूमशाही मानसिकतेच्या मोदी सरकारला मदत होत आहे. हा निर्णय झाला असेल तर दुर्देवी आहे.आधी आम्हाला शंका होती. आम्हाला वाटत होतं, पवार साहेब इतकी वर्ष धर्मनिरपेक्ष विचारांचं राजकारण करत आहेत. निर्णय घेण्याआधी शंभरवेळा विार करतील. पण असं झालं नाही, याचं दुर्देव आहे” अशी भावना सचिन सावंत यांनी बोलून दाखवली. डिलिमिटेशनच्या बाबतीत शरद पवार यांची ही भूमिका काँग्रेसला झटका देणारी आहे. कारण काँग्रेस मोदी सरकारच्या या विधेयकाच्या विरोधात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात खासदारांची संख्या वाढणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us