Ramayana Box office collection : रामायण चित्रपटाचा 27 देशात डंका, कमाईत रचला नवा इतिहास, बाहुबली- 2 ला मागे टाकणार?
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 64.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. Sacnilk च्या रिपोर्टनुसार 'रामायण' चित्रपटाने 22 व्या दिवशी 9.65 कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 992.10 कोटी रुपये कमवले आहेत.

Ramayan Box office collection : सध्या रामायण चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने नवे शिखर गाठले आहे. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर यांनी प्रभू राम तर यशने रावणाचे पात्र साकारले आहे. दरम्यान, बम्पर कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आता नवे रेकॉर्ड रचले आहे. हा चित्रपट 27 देशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय.
रामायण चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. आता या चित्रपटाने आणखी एक महारेकॉर्ड आपल्य नावावर केलेय. रामायण चित्रपट एकूण 27 देशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. हा चित्रपट लवकरच 1000 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. रामायण उत्तर अमेरिका, युरोप, दक्षिण पूर्व आशिया तसेच आफ्रिकेच्या काही भागात आवडीने पाहिला जातोय. म्हणूनच हा चित्रपट साधारण 27 देशांत पहिल्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. युनायडेट किंगडम, अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड या देशांतही हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय.
बाहुबली -2 चित्रपटाचे रेकॉर्ड मोडणार का?
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 64.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. Sacnilk च्या रिपोर्टनुसार ‘रामायण’ चित्रपटाने 22 व्या दिवशी 9.65 कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 992.10 कोटी रुपये कमवले आहेत. तर या चित्रपटाची एकूण कमाई ही 1783 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने पुष्पा-2 या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केलेय. आता पुढच्या काही दिवसांत ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ या चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल केला जातोय. या चित्रपटाने 1788.06 कोटींची कमाई केलेली आहे. म्हणजेच बाहुबली- 2 चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडण्यासाठी रामायण चित्रपटाला फक्त आणखी 4 कोटी कमवावे लागणार आहे. दरम्यान या चित्रपटावर काही सिने रसिकांनी टीका केली. तर काही सिनेरसिकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
