Sharad Pawar: ‘गोकुळ’च्या राजकारणावर वॉच! शरद पवार अलर्ट मोडवर, क्षणाक्षणाची घेतायेत अपडेट, VIDEO समोर आला

पश्चिम महाराष्ट्रात सरकारविरोधात एल्गार सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा एक खास व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

Sharad Pawar: गोकुळच्या राजकारणावर वॉच! शरद पवार अलर्ट मोडवर, क्षणाक्षणाची घेतायेत अपडेट, VIDEO समोर आला
| Updated on: Nov 09, 2026 | 5:36 PM

Sharad Pawar News:  गोकुळवर चार संचालक नियुक्त करण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात आज कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा निघाला. सतेज पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते.  एकीकडे राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सरकारविरोधात एल्गार सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा एक खास व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

कोल्हापुरमध्ये सरकारविरोधात एल्गार, घडामोडींवर शरद पवारांचा वॉच

Loading...

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रकृती ठीक नसल्याने विश्रांती घेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार हे रुग्णालयातून घरी परतले होते. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ते आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत, सोबतच ते गोकुळच्या संदर्भात सुरु असलेल्या घडामोडींवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

आज कोल्हापुरमध्ये राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विराट असा संघर्ष मोर्चा निघाला.  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आपल्या कार्यालयात बसून या मोर्चामधील घडामोडी बारकाईने पाहत होते.  खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे टिव्हीवर कोल्हापुरमधील संघर्ष मोर्चामधील बातम्या पाहताना दिसत आहेत.


काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे? 

“‘गोकुळ’ दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुक निकालानंतर शासनाने चार सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण तरीही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची हा हट्ट अनाकलनीय आहे. याविरोधात कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर आदरणीय पवार साहेब लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. कोल्हापूरच्या जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us