शरद पवारांचं वर्क फ्रॉम हॉस्पिटल! जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल भेटीला; राजकीय हालचालींना वेग?
शरद पवारांना काल रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही शरद पवार कामात सक्रिया आहेत. काल जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली.

शरद पवार यांना गुरुवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर त्यांना नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यानंतरही शरद पवार कामात सक्रिय आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर जयंत पाटील, प्रफुल पटेल हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे या पक्षाची बैठक अर्ध्यात सोडून ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या. सुप्रिया सुळे यांनी काल ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार’.
आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर सांगितलं की, आदरणीय पवार साहेब यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुप्रियाताई सध्या प्रत्यक्ष साहेबांना भेटून पुन्हा बैठकीसाठी येत आहेत. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू राहतील. त्यामुळं साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये’.
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ प्रफुल पटेल देखील पोहोचले होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या होत्या. ‘माझ्या मुलीच्या सासूवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहेब दाखल झाल्याचे समजल्यावर मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो. मी भेटायला गेलो, त्यावेळी ते जेवण करत होते. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना काळजी करण्याचं कारण नााही, असं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिलं.
सुप्रिया सुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच प्रफुल्ल पटेलही तिथे दाखल झाले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी राजकीय चर्चांच्या शक्यता फेटाळून लावल्या. “योगायोगाने माझ्या मुलीच्या सासूबाईंवरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहेब दाखल झाल्याचे समजल्यावर मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो. मी भेटलो तेव्हा ते जेवण करत होते, त्यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही,” असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले. दरम्यान, सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे देखील रुग्णालयात पोहोचले आहेत.
पडद्यामागे काय राजकारण शिजतंय?
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पडद्यामागे हालाचाली सुरू असल्याची चर्चा सुरुये. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याआधीच त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करत विश्रांतीचा सल्ला दिला होता. तुम्ही आत विश्रांती करा. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, असे मोदींनी शरद पवारांना सांगितले होते. एकीकडे काल रुग्णालयात प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची रुग्णालयात उपस्थिती होती. दुसरीकडे रोहित पवार बैठकीत थांबले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा मोठा भूकंप किंवा राष्ट्रवादीच्या एकजुटीचा नवा प्रयोग पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.