AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत. ते जर 2014 किंवा 2019 साली एनडीएमध्ये आले असते. तर त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार होऊ शकला असता, असं मोठं विधानही रामदास आठवले यांनी केले.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते...केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!
sharad pawar and ramdas athawaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2026 | 3:00 PM
Share

Sharad Pawar And Ramdas Athawale : खासदार शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. मतदारसंघ पूनर्रचना विधेयकात सरकार प्रत्येक राज्यात 50 टक्क्यांनी जागा वाढवल्या तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या वेधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचार केला जाईल, असे पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, आता शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. असे असतानाच एनडीएचा सहभाग असलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शरद पवारांची साथ तसेच पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद यावर त्यांनी भाष्य केलंय.

अजूनही वेळ गेलेली नाहीये

शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या शक्यतेबाबत रामदास आठवले यांना विचारण्यात आले. यावर बोलताना आता देखील शरद पवारांनी एनडीएमध्ये यायला काही हरकत नाही. त्यांनी जर आज निर्णय घेतला तर त्यांचे आठ खासदार एनडीएच्या सोबत येतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा. एनडीएमध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू, असे रामदास आठवले म्हणाले.

राष्ट्रपती व्हायचंय असा प्रस्ताव ठेवला असता तर…

शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत. ते जर 2014 किंवा 2019 साली एनडीएमध्ये आले असते. तर त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार होऊ शकला असता, असं मोठं विधानही त्यांनी केले. शरद पवार एनडीएत आले असते आणि त्यांनी मला राष्ट्रपती व्हायचंय असा प्रस्ताव ठेवला असता तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भूमिका मान्य केली असती, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

तप्रधान म्हणून शरद पवार यांचाही नंबर लागू शकला असता

केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेत असताना रामदास आठवले यूपीएसोबत होते. त्यावेळची आठवणही त्यांनी सांगितली. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. सोनिया गांधी बरोबर जर आपले संबंध चांगले वाढवले असते तर कदाचित मनमोहन सिंग दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. त्यावेळी कदाचित पंतप्रधान म्हणून शरद पवार यांचाही नंबर लागू शकला असता, असंही मत आठवलेंनी व्यक्त केलं.

शरद पवार एनडीएमध्ये आल्यावर काय होणार?

शरद पवार यांनी एनडीएमध्ये का यावं? ते एनडीएमध्ये आले तर त्याचा काय फायदा होईल, असं रामदास आठवले यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना आताही शरद पवारांनी एनडीएमध्ये यायला काही हरकत नाही. त्यांनी जर आज निर्णय घेतला तर त्यांचे आठ खासदार आहेत. त्यांचे आठ खासदार एनडीएसोबत येतील, असा हिशोब त्यांनी मांडला. तसेच अजून ही वेळ गेलेली नाहीये. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा. एनडीएमध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू, असा प्रस्तावत त्यांनी शरद पवार यांना दिला. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?