AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?

महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी खळबळ उडवली आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर महिन्याभरातच हे ऑपरेशन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार टार्गेट असतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटात दुसरा मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता असून, राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?
ऑपरेशन टायगर कधी ?Image Credit source: social media
| Updated on: Apr 10, 2026 | 11:59 AM
Share

आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी शिंदे गटाचे मंत्रीच आता ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत देत आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तर महिन्याभरातच ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ठाकरे गटात दुसरा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे दाट संकेत मिळत आहेत. यावेळी ऑपरेशन टायगरमध्ये फक्त खासदार टार्गेट असल्याचंही सांगितलं जात आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरवर बिनधास्त विधान केलं आहे. आम्ही कोणाशी संपर्क साधला नाही. स्वतःहून अनेकजण एकनाथ शिंदेंबरोबर संपर्क साधत आहेत. ऑपरेशन टायगर सांगून केलं जाणार नाही. ऐन वेळेला एकनाथ शिंदे निर्णय घेतील, त्यावेळेस आपल्याला कळेल.कोणतेही ऑपरेशन करताना त्याचा बँड बाजा वाजून ते करत नसतात. आमदार, खासदार आणि पदाधिकारी रोजच्या रोज एकनाथ शिंदेंकडे येत असतात. रोज त्यांना सांगत असतात. परंतु योग्य वेळी निर्णय घेणे ही एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे, असं सांगतानाच तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखी काही आहे हे कळेल, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

स्फोट शेवटच्या टप्प्यात

ऑपरेशन टायगर कोणत्या टप्प्यात आहे? असा सवाल शिरसाट यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता हे सगळं शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच याबद्दलचा स्फोट तुम्हाला उबाठामध्ये झालेला दिसेल, असंही शिरसाट यांनी थेटच सांगितलं.

तुम्ही कीव करा, आम्ही ऑपरेशन

यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगरची कीव येते असं म्हटलं होतं. शिरसाट यांनी त्यावर पलटवार केला. अरविंद सावंत तुम्ही कीव करत बसा. कीव करत बसता बसता अख्खा पक्ष फुटला. आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले आणि तुम्हाला कीव करावीशी वाटते. तुमची कीव आता महाराष्ट्राला येत आहे. तुम्हाला कीव करायची असेल तर संजय राऊतची करा आणि त्या उबाठाची करा आमचं जे ऑपरेशन आहे ते चालू राहील, असंही त्यांनी सांगितलं.

कोण अपयशी? देणंघेणं नाही

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. कोणत्या पक्षात काय चाललंय याच्याविषयी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला फक्त एवढेच माहीत होतं की, सुनेत्रा वहिनींची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अजितदादांचे योगदान बारामतीसाठी फार मोठं आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. आता इंटरनल पॉलिटिक्स काय आहे, तटकरे अपयशी की प्रफुल पटेल अपयशी? या भानगडीत आम्ही पडणार नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक