आदित्य ठाकरे थापा मारणार नाही, वस्तुस्थितीच त्यांनी मांडली; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Apr 14, 2023 | 11:49 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथे एक मोठं वक्तव्य केलं होतं, त्याबाबत कॉंग्रेसच्या बड्या नेत्यानी प्रतिक्रिया दिली असून चर्चेचा विषय ठरत आहे.

आदित्य ठाकरे थापा मारणार नाही, वस्तुस्थितीच त्यांनी मांडली; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया काय?
Image Credit source: Google
Follow us on

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्या अगोदर मातोश्रीवर येऊन रडले होते, त्यांनी भाजपसोबत गेलो नाहीतर जेलमध्ये टाकतील असं म्हंटलं होतं. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता. हैदराबाद येथे एका विद्यार्थी संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत एकनाथ शिंद यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्री आणि आमदारांकडून टीका केली जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे हे बालिश असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता.

आदित्य ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केला असला तरी यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यावर नुकतीच कॉंग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले , आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य थापा मारणारं नाही. जी वस्तुस्थिती आहे तीच त्यांनी मांडली असावी, मी त्यांना जवळून ओळखतो असा दावा केला आहे. एकूणच आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात कॉंग्रेसकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर महाविकास आघाडी मधून बाहेर पडावे हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे गेले होते, त्यांनी अनेकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत माहिती दिली होती, मात्र आदित्य ठाकरे यांनी रडले हे सांगणं चुकीचं असल्याचे संजय शिरसाठ यांनी म्हंटलं होतं.

एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर फारसं भाष्य केले नव्हते. त्यांनी आदित्य ठाकरे बालिश असल्याचे म्हंटलं होतं. त्यावरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. त्यावर संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे जे सांगत आहे ते खरं आहे, त्यात खोटं काहीही नाही असं समर्थनार्थ मत संजय राऊत यांनी मांडलं होतं. त्यावरून कॉंग्रेसकडून आलेली प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरत आहे. तर याच दरम्यान दादा भुसे यांनी नुकतीच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

दादा भुसे म्हणाले आदित्य ठाकरे बालिश असून त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. 1857 चं ते कशाला आत्ता बोलत आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. मात्र दुसरीकडे यावर कॉंग्रेसने आदित्य यांची बाजू घेतल्याचे पाहायला मिळत आहे.