राहुल गांधींच्या संगतीचा परिणाम लागला, आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या मंत्र्याचा घणाघात, नेमकं काय म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आणि अजित पवार अस्वस्थ आहे आहे का? यावर शिवसेनेच्या मंत्र्याने भुवया उंचवणारी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींच्या संगतीचा परिणाम लागला, आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या मंत्र्याचा घणाघात, नेमकं काय म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 11:07 AM

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्याआधी मातोश्रीवर येऊन रडले होते. त्यांनी म्हंटलं होतं की भाजपसोबत गेलो नाहीतर मला जेलमध्ये टाकतील. असं आदित्य ठाकरे यांनी हैदराबादमध्ये एका संवादाच्या दरम्यान म्हंटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना बालिश म्हणत टीका केली होती. त्यावरच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदेंच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्याबाबतही मोठं वक्तव्य केले आहे.

मंत्री दादा भुसे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. बालिशपणा आहे अस मला वाटतं. त्याच वेळी बोलायला हवं होत. 1857 चं त्यांना आज आठवेल तर कस चालेल असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे यांची ही राहुल गाधी स्टाईल आहे. बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहे. राहुल गांधी यांच्या संगतीचा परिणाम आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संगतीचा परिणाम आहे असेही दादा भुसे यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

विकासाची काम होत आहे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. विकासावर बोलायला तयार नाही. शिवसेना हा पक्ष असा आहे. तळागाळात जाऊन काम करणारा पक्ष आहे असेही दादा भुसे यांनी म्हणत आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

अजित पवार हे भाजप सोबत येणार आहे की नाही याबाबत दादा भुसे यांनी थेट बोलणं टाळलं असलं तरी भुवया उंचवणारे वक्तव्य केले आहे. दादा भुसे म्हणाले अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या युतीबाबत बाबत मला माहीत नाही.

वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहे. अजित दादा अस्वस्त आहे. अनेक वर्षांपासून अजित दादा अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकत असं म्हणत दादा भुसे यांनी महाविकास आघाडीला चिमटे काढले आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दादा भुसे हे उशिरा एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल झाले होते. सध्या दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे बंदरे आणि खनिकर्म मंत्रीपद आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ भाष्य करत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Non Stop LIVE Update
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.