Sanjay Raut : महाराष्ट्रात काय होईल? मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला

राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यांची ही कृती स्वागतार्ह आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्रात काय होईल? मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 11:06 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : विरोधी पक्षाने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी गाठीभेटीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय हालचाली घडणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार आहे हे स्पष्टच सांगितलं आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

काल दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधींची चर्चा झाली. हे चांगले संकेत आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. राहुल गांधी हे ममता बॅनर्जींना भेटणार आहेत. त्याचं स्वागत करतो. विरोधक एकत्र येऊ नये असा भाजपचा भ्रम आहे, तो तुटणार आहे. 2024ला विरोधक एकत्र येतील. काँग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल मुंबईत येत आहेत. ते उद्धव ठाकरे यांना भेटतील. त्यानंतर खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी भेट होऊ शकते, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अनेक गोष्टी ठरतील

मी दिल्लीत राहुल गांधींना भेटलो होतो. सोनिया गांधी यांनाही भेटलो होतो. त्यांना मुंबईत येण्यास सांगितलं होतं. राहुल गांधी लोकप्रिय नेते आहेत. लोकशाही विरोधात त्यांचा संघर्ष आहे. आमचे काही मतभेद आहेत. ते दूर ठेवून देशात ते परिवर्तन होऊ घातलं आहे. त्यात काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सर्व विरोधी पक्षांसोबत राहुल गांधी आणि खरगे यांचा संवाद सुरू आहे. तो आशावादी आहे. खरगे यांच्याकडून संपूर्ण काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना भेटायला वेणूगोपाल येणार आहेत. त्यात अनेक गोष्टी ठरतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

40 जागा जिंकणार

देशातला प्रमुख विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील हे सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही आशादायी गोष्ट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची बैठक झाली. त्यानंतर काल दिल्लीत पवार खरगे आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून एकत्र येण्यासाठी राहुल गांधी काम करत आहेत. आम्ही त्यात आहोत. ममहाराष्ट्रात काय होईल असं म्हणाल तर आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.